नागपुरात २९ पासून बाल चित्रपट महोत्सव
By admin | Updated: September 2, 2015 23:31 IST
नागपुरात २९ पासून बाल चित्रपट महोत्सव
नागपुरात २९ पासून बाल चित्रपट महोत्सव
नागपुरात २९ पासून बाल चित्रपट महोत्सव नागपूर : नागपूर येथील शहरी व ग्रामीण भागातील ४ थी व ९ व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी २९ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर या कालावधीत रोज सकाळी ९ ते ११ या वेळात मोफत बाल चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात यासंदर्भात आयोजित बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी भगत यांनी ही माहिती दिली. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, बाल चित्र समितीचे सहायक वितरण अधिकारी मोहन हेरकल, उमरेडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, सावनेरच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, जिल्ह परिषद उपशिक्षणाधिकारी सतीश मेंढे, महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी अशोक टालाटुले, नायब तहसीलदार सरिता पाटील, तसेच चित्रपटगृहाचे व्यवस्थापकही उपस्थित होते. ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी व शहरी भागात सभागृहात असलेल्या शाळेत, तसेच शहरातील खासगी शाळेत बाल चित्रपट दाखविण्यात यावा, असे रवींद्र कुंभारे यांनी सांगितले. चित्रपट प्रक्षेपित करण्यासाठी शाळेला एक हजार पाचशे रुपये तर चित्रपटागृहाला दोन हजार पाचशे रुपये भाडे देण्यात येईल, असे हेरकल यांनी सांगितले. या महोत्सावात दाखविण्यात येणाऱ्या मराठी व हिंदी बाल चित्रपटांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. भगत यांनी केले.