मुख्यमंत्री परतले
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
मुख्यमंत्री पार्सेकर दिल्लीहून परतले
मुख्यमंत्री परतले
मुख्यमंत्री पार्सेकर दिल्लीहून परतलेपणजी : सोमवारी दिल्ली भेटीवर गेलेले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर बुधवारी गोव्यात परतले. दिल्ली भेटीवेळी पार्सेकर यांनी संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांची भेट घेऊन राजकीय स्वरूपाचीही चर्चा केली. मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयीही चर्चा झाली. केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी गोव्यात आयआयटी प्रकल्पासाठी लाखो चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन पाहण्यास मुख्यमंत्र्यांना सांगितले. तथापि, तेवढी जमीन उपलब्ध नसल्याने गोवा सरकारने आयआयटी प्रकल्पाचा नाद सोडून दिल्याचे सूत्रांनी सांगितले.(खास प्रतिनिधी)