शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदी जयराम ठाकूर, सोहळ्याला पंतप्रधानांसह भाजपाचे अनेक बडे नेते उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:54 AM

हिमाचल प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून जयराम ठाकूर यांनी बुधवारी येथे शपथ घेतली. रीज ग्राऊंडवर झालेल्या या समारंभात ११ मंत्र्यांनाही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

शिमला : हिमाचल प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून जयराम ठाकूर यांनी बुधवारी येथे शपथ घेतली. रीज ग्राऊंडवर झालेल्या या समारंभात११ मंत्र्यांनाही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिमंडळात सहा नव्या चेह-यांना संधी मिळाली आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. मंत्रिमंडळातील सर्व १२ जागा भरण्यात आल्या असून दोन आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून सामावून घेतले जाईल. राजीव बिंदाल हे विधानसभेचे अध्यक्ष असतील. सुरेश भारद्वाज व गोविंद सिंह यांनी संस्कृतमधून तर इतरांनी हिंदीतून शपथ घेतली. मंत्रिमंडळात सर्वीन चौधरी या एकमेव महिला आहेत. नव्या मंत्र्यांमध्ये मोहिंदर सिंह, कृष्णन कपूर, सुरेश भारद्वाज, अनिल शर्मा, सर्वीनचौधरी, राम लाल मार्केंड, विपीन परमार, विरेंद्र कंवर, गोविंद ठाकूर, राजीव सैझल आणि विक्रम सिंह यांचा समावेश आहे. जय रामठाकूर यांच्यासह दोन मंत्री मंडी जिल्ह्यातील आहेत.पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रोमेश धवाला व नरेंद्र ब्रॅगाटा यांना मंत्रीपद दिले गेलेले नाही. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह सहा राजपूत (मोहिंदर सिंह, विपीनपरमार, विरेंद्र कंवर, गोविंद ठाकूर आणि विक्रम सिंह), तीन ब्राह्मण (सुरेश भारद्वाज, अनिल शर्मा व राम लाल मार्केंड) आणि दोन इतर मागासवर्गीय आहेत.>एकाच जिल्ह्यातून चौघांना मंत्रिपदचार जण कांगरा तर शिमला, सोलन, कुल्लू, ऊना वलाहौल आणि स्पिती जिल्ह्यांतून प्रत्येकी एकाला तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नद्दा यांचा बिलासपूर व माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल यांचा हमीरपूर जिल्हा तसेच चांभा व सिरमूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.भाजपने विधानसभेच्या ताज्या निवडणुकीत कांगरा व मंडी जिल्ह्यात २० जागा जिंकल्या आहेत. याशिवाय अनुसूचित जातींसाठीच्या १७ पैकी १३ तर अनुसूचित जमातींसाठीच्या तीनपैकी २ जागा जिंकल्या.