शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी डिझेल टँकर उडवला; तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 16:30 IST

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक डिझेल टँकर उडवल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक डिझेल टँकर उडवल्याची घटना समोर आली आहे.तीन जणांचा मृत्यू झाला आहे.कांकेर जिल्ह्यातील ताडोकी परिसरातील कोसरोंडा आणि तुमापाल गावादरम्यान ही घटना घडली.

नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक डिझेल टँकर उडवल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (24 सप्टेंबर) कांकेर जिल्ह्यातील ताडोकी परिसरात नक्षलवाद्यांनी डिझेल टँकर उडवल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. 

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांकेर जिल्ह्यातील ताडोकी परिसरातील कोसरोंडा आणि तुमापाल गावादरम्यान ही घटना घडली. काही दिवसांपासून परिसरात रेल्वे रुळाचे काम सुरू आहे. कामाच्या ठिकाणी हे डिझेल टँकर नेले जात होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक डिझेल टँकर उडवला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचीही माहिती मिळत आहे.

छत्तीसगडमधील नारायणपूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी (24 ऑगस्ट) चकमक झाली होती. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. डीआरजीचे दोन जवान या चकमकी दरम्यान जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये शनिवारी सकाळी चकमक झाली. सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला होता. चकमकीदरम्यान दोन जवान जखमी झाले. तसेच पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते.

महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बागनदी ठाण्यांतर्गत असलेल्या बोरतलाव येथे याआधी काही दिवसांपूर्वी चकमक झाली होती. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात पोलीस व नक्षलवाद्यांत चकमक उडून त्यामध्ये सात नक्षलवादी ठार झाले होते. या भागातून नक्षली जात असल्याची खबर छत्तीसगड पोलिसांना मिळताच जिल्हा पोलीस व सीएएफची पार्टी रवाना झाली. नक्षली व पोलिसांदरम्यान झालेल्या गोळीबारानंतर सात नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचसोबत ए.के. 47, 303 रायफल, 12 बोर बंदुका व अन्य नक्षल सामग्री ताब्यात घेतली होती. या चकमकीत तीन पोलिस जवान जखमी झाले होते.  

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी