शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

चेनानी-नाशरी बोगदा झाला तयार!

By admin | Updated: April 2, 2017 01:04 IST

जम्मूहून श्रीनगर राष्ट्रीय महागार्गावरील उधमपूर ते रामबन या १0.८९ किलोमीटरच्या सर्वांत मोठ्या बोगद्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, २ एप्रिल रोजी होत आहे.

सुरेश भटेवरा, चेनानी (उधमपूर)जम्मूहून श्रीनगर राष्ट्रीय महागार्गावरील उधमपूर ते रामबन या १0.८९ किलोमीटरच्या सर्वांत मोठ्या बोगद्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, २ एप्रिल रोजी होत आहे. रस्ता वाहतूक विश्वस्तरीय बनवण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या नितीन गडकरींच्या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या इतिहासात चेनानी-नाशरी या बोगद्यामुळे सुवर्णपान जोडले जाणार आहे. देशातील सर्वांत लांब अंतराच्या या बोगद्याचे प्रत्यक्ष काम यूपीए सरकारच्या कालखंडात २३ मे २0११ रोजी सुरू झाले. पुढे २0१४ साली मोदी सरकार आल्यानंतर गडकरींनी २५१९ कोटी रुपये खर्चाच्या फास्ट ट्रॅक योजनेत याचा समावेश केला. हिमालयाच्या शृंखलेतील खालच्या पर्वतरांगांमधे १२00 मीटर्सच्या उंचीवरील ही योजना अवघ्या ३ वर्षांत साकार झाली. जम्मू-श्रीनगर या २८६ कि.मी. अंतराच्या चार लेन महामार्गावर बोगद्याचे प्रत्यक्ष अंतर ९.२ किलोमीटर्सचे आहे. बोगद्याच्या दोन्ही तोंडांपाशी दोन पूल तयार करण्यात आल्याने बोगद्याचा प्रकल्प १0.८९ कि.मी. अंतराचा झाला आहे. जम्मू-श्रीनगरचे अंतर या बोगद्यामुळे ४0 किलोमीटरने कमी होणार असून, प्रवासाचा वेळ अडीच तासाने वाचेल. आशिया खंडातील या सर्वांत मोठ्या व लक्षवेधी बोगद्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. अर्धवर्तुळाकार मुख्य बोगद्याची लांबी ९.२0 कि.मी. व रुंदी ९.३५ मीटर्स आहे. याखेरीज दोन्ही बाजूला १.३0 मीटर्सचे पादचारी मार्ग आहेत. याच बोगद्याला जोडून समांतर रेषेत दुसरा एक बोगदाही तयार करण्यात आला आहे. बंद पडलेल्या वाहनांमुळे बोगद्यात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी ही व्यवस्था आहे. दोन्ही बोगद्यांना जोडणारे २९ क्रॉसिंग टनेल्स आहेत. प्रत्येक क्रॉसिंग ३५ मीटर्स लांबीचे आहे. जगात महामार्गावरील सर्वांत मोठा बोगदा आॅरलँड व लायरडेल मार्गावर नॉर्वेत आहे. त्याची लांबी २४.५१ कि.मी. आहे. त्याखालोखाल आशिया खंडातल्या सर्वांत मोठ्या बोगद्याची निर्मिती भारतात झाली आहे. बोगद्यातील वाहतूक सुरळीतपणे चालावी यासाठी ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम, आकर्षक विद्युतरोशणाई, प्रवेश नियंत्रण प्रणाली, उत्तम अग्निशमन व्यवस्था, २४ तास व्हिडीओद्वारे देखरेख, एफ एम रिब्रॉडकास्ट व्यवस्था, वायरलेस कम्युनिकेशन, उत्तम वायुविजन, संकटाची माहिती देण्यासाठी प्रत्येक १५0 मीटर्सवर एसओएस कॉल व्यवस्था, अशा आधुनिक यंत्रणा आहेत. हिमालयाच्या पर्वतरांगांमधील अत्यंत कठीण भागात स्थापत्य कलेचा हा उत्तम आविष्कार आहे. बोगदा पर्वताच्या आतून असल्याने वृक्षतोड अथवा पर्यावरणाची कोणतीही हानी झालेली नाही.