शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा हेतू तपासा

By admin | Updated: November 22, 2015 01:47 IST

गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला जगभर नावाजले जाते. अशा महोत्सवात गोंधळ घालणाऱ्या एफटीआयआयच्या काही विद्यार्थ्यांमुळे आंतरराष्ट्रीय

- संदीप आडनाईक,  पणजी

गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला जगभर नावाजले जाते. अशा महोत्सवात गोंधळ घालणाऱ्या एफटीआयआयच्या काही विद्यार्थ्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर महोत्सवाला गालबोट लागू नये. या विद्यार्थ्यांच्या या जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या कृत्याचा हेतू तपासा, असे आवाहन माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धनसिंग राठोड यांनी शनिवारी येथे केले.४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कर्नल राठोड येथे आले आहेत. त्यांची प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला, तेव्हा त्यांनी चित्रपट व्यवसायाशी संबंधित काही गोष्टींबाबत भूमिका स्पष्ट केली. फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकाराबद्दल कर्नल राठोड म्हणाले की, भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करण्याचा प्रयत्न हा निंदाजनक आहे. विशेषत: भारतीय व्यक्तींकडूनच तसा प्रकार होणार असेल, तर कठोर कारवाई ही व्हायलाच हवी. त्यात मी स्वत: हस्तक्षेप करणार नाही; पण अशा प्रकाराची मी अपेक्षाच केली नव्हती.जेम्स बाँडच्या ‘स्पेक्टर’ आणि यशराज फिल्मस्च्या ‘तितली’ यासारख्या चित्रपटांतील संवादांना तसेच काही दृश्यांना कात्री लावण्यात आल्याच्या मुद्द्यावरही कर्नल राठोड यांना विचारले असता ते म्हणाले की, सेन्सॉर बोर्डाचे मुख्य काम हे प्रमाणपत्र देण्याचे आहे. ज्या चित्रपटाची निर्मिती झाली, त्यांना प्रमाणपत्र द्या; पण त्यांच्या विचारांवर आक्षेप घेण्याचा मुळातच बोर्डाला अधिकार नाही आणि त्यात सरकार हस्तक्षेपही करीत नाही. सेन्सॉर बोर्ड पारदर्शकसेन्सॉर बोर्डाचे कामकाज अधिक पारदर्शक करण्यात येत आहे. ही प्रक्रिया आम्ही आता आॅनलाइन सुरू करत आहोत. याशिवाय प्रमाणपत्राची प्रतही तत्काळ पीडीएफ फॉर्मेटमध्ये देण्यात येणार आहे. चित्रपट निर्मात्यांच्या अधिकारावर गदा येऊ नये, यासाठी काळजी घेतली जाईल. येत्या पाच वर्षांत सॉफ्टवेअरमध्येही आमूलाग्र बदल करण्यात येतील, असेही राठोड यांनी सांगितले.नवा सिनेमॅटोग्राफ अ‍ॅक्ट लवकरचजुन्या काळापासून चालत आलेल्या सिनेमॅटोग्राफ अ‍ॅक्टमध्ये आम्ही बदल करण्याचा विचार करत आहोत. त्यावर तज्ज्ञांशी आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंतांशी चर्चा केल्यानंतर त्याचे नवीन कायद्यात बदल करण्यात येईल, अशी माहितीही कर्नल राठोड यांनी दिली....तर निहलानी यांच्यावरकारवाई - कर्नल राठोडसेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी केलेल्या काही विधानांवरून गदारोळ उठला आहे. त्यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्नविचारला असता कर्नल राठोड यांनी सांगितले की, याची माहिती घेईन. व्यक्तिगत पातळीवर त्यांनी काही विधान केले असेल तर त्यावर सरकारचे काही नियंत्रण असणार नाही; कारण तो भाषास्वातंत्र्यांचा भाग आहे; परंतु सेन्सॉर बोर्डाशी संबंधित काही वक्तव्य त्यांनी केले असेल तर देश आणि जनतेच्या हितासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार करू.