नोकरीच्या आमिषाने फसवणूक
By admin | Updated: November 1, 2015 00:27 IST
नाशिक : नोकरीच्या आमिषाने एका युवकाची हजारो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, तारवालानगर येथील रणजित रमेश बोधक (२६) यास संशयित दगडू चौधरी (रा. जळगाव) याने मुंबईतील जे़ जे़ रुग्णालयात वॉर्डबॉयची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २५ हजार रुपये घेतले़ मात्र पैसे घेतल्यानंतर चौधरीने नोकरीविषयी तसेच पैसे परत देण्याविषयी टाळाटाळ केली़ यामुळे रणजित यास फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला़ (प्रतिनिधी)