चौकट मोदी यांनी बारामतीत क
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
ाय पाहिले...
चौकट मोदी यांनी बारामतीत क
ाय पाहिले...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान, कृषी विकास प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांच्या कार्यक्रमाला विशेष वेळ दिला. सकाळी ११.४५ वाजता विमानतळावर आगमन झाले. तेथे भाजपच्या पदाधिकार्यांसह शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांनी स्वागत केले. तेथून विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेला भेट दिली. या संस्थेच्या आवारात असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती घेतली. त्यानंतर शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीत आतापर्यंत मिळालेल्या वस्तूसंग्रहालयाला भेट दिली. जवळपास १० मिनिटे वस्तुसंग्रहालयाची पाहणी केली. तेथून या संस्थेच्या सीबीएसई स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेथून कृषी विकास प्रतिष्ठानच्या आवारातील आप्पासाहेब पवार सभागृहाचे उद्घाटन त्यांनी केले. या ठिकाणी त्यांना या संस्थेची चित्रफित दाखविण्यात आली. तेथून कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. कृषी विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या शैक्षणिक, संशोधन उपक्रमाची माहिती घेतली. त्यानंतर मोदी शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहिले. सकाळी ११.४५ ते २ वाजून १० मिनिटापर्यंत या कार्यक्रमांमध्ये मोदी सहभागी झाले. शेतकरी मेळावा झाल्यानंतर शरद पवार यांच्या गोविंद बाग या माळेगावातील निवास स्थानी स्नेह भोजन झाले. तेथून मेडद (ता. बारामती) गावच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या हेलिपॅड येथून पुण्याला रवाना झाले.