शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

चतुर्वेदी, गुप्ता मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 23:21 IST

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे भारतीय सनदी अधिकारी संजीव चतुर्वेदी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्नावर अखंड कार्य करणारे अंशू गुप्ता यांना आज मॅगसेसे

मनिला : भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे भारतीय सनदी अधिकारी संजीव चतुर्वेदी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्नावर अखंड कार्य करणारे अंशू गुप्ता यांना आज मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मॅगसेसे पुरस्कार हा आशियातील नोबेल पुरस्कार म्हणूनही गणला जातो. फिलिपीनचे राष्ट्रपती बेनिग्नो सिमोन कोजुआंग्वो एक्विनो यांनी सुवर्णपदक देऊन चतुर्वेदी आणि गुप्ता यांचा सन्मान केला.संजीव चतुर्वेदी हे २००२ च्या आयएफएस बॅचचे अधिकारी आहेत. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. फिलिपीनची राजधानी मनिला येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना एम्सचे उपसचिव असलेले चतुर्वेदी म्हणाले की, प्रामाणिकपणे कार्य करताना मिळालेला हा पुरस्कार निश्चितच मनोबल वाढविणारा आहे. भारताच्या लोकसंख्येचा मोठा भाग हा १५ ते ३५ वर्षे वयोगटातील आहे. प्रशासनातील पारदर्शकता आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी हा तरुण वर्ग उत्सुक आहे. प्रामाणिकपणा, साहस आणि सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश यासाठी चतुर्वेदी यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.अंशू गुप्ता यांनी १९९९ मध्ये २७ व्या वर्षी कॉर्पोरेट सेक्टरमधील नोकरीवर पाणी सोडत गुंज ही संस्था स्थापन केली. गरिबांना कपडे पुरविण्यासोबतच ही संस्था गरीब महिलांना सॅनिटरी पॅड पुरविते. आपल्याला गरिबीविरुद्धची लढाई लढायची असून तेच सर्वात मोठे आव्हान आहे, असे गुप्ता यावेळी म्हणाले. (वृत्तसंस्था)