शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चतु:संप्रदाय आखाड्याचे शनिवारी ध्वजारोहण

By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST

नाशिक : साधुग्राममधील दिगंबर, निर्वाणी, निर्मोही या तिन्ही अनी आखाड्यांच्या ध्वजारोहणानंतर आता चतु:संप्रदाय खालशात शनिवारी (दि.२२) सकाळी आठ वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी चतु:संप्रदाय खालशात ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. चतु:संप्रदाय आखाड्याचा ध्वज लाल रंगाचा असणार आहे. त्यावर पर्वत घेऊन जाणार्‍या हनुमानाचे निशाण असणार आहे.

नाशिक : साधुग्राममधील दिगंबर, निर्वाणी, निर्मोही या तिन्ही अनी आखाड्यांच्या ध्वजारोहणानंतर आता चतु:संप्रदाय खालशात शनिवारी (दि.२२) सकाळी आठ वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी चतु:संप्रदाय खालशात ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. चतु:संप्रदाय आखाड्याचा ध्वज लाल रंगाचा असणार आहे. त्यावर पर्वत घेऊन जाणार्‍या हनुमानाचे निशाण असणार आहे.
ध्वजाची लांबी २१ फूट, तर रुंदी ८ फूट असणार आहे. लाल रंगाचा हनुमानाला शेंदूर लावला जात असल्याने ध्वजेचा रंग लाल असल्याचे सांगण्यात येत आहे. साधू- महंतांकडून होणार्‍या चुकांबाबतची सुनावणी याठिकाणी होऊन त्यांना दंड व शिक्षा देण्याचा अधिकार चतु:संप्रदाय खालशाला देण्यात आला आहे. सदर खालशात तिन्ही अनी आखाड्यांतून एका महंतांची नियुक्ती करण्यात येते. चारही महंतांच्या स्वाक्षरीने शिक्षा, दंड ठरविण्यात येतो. कुंभमेळा दरम्यान न्यायालयीन प्रक्रिया या आखाड्यात पार पाडली जाते. चतु:संप्रदाय आखाड्यात तिन्ही अनी आखाड्यांतील साधू-महंतांचे वादग्रस्त प्रश्न मिटविले जातात. त्यासाठी चतु:संप्रदाय खालशाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच महंत, महामंडलेश्वर पदव्या प्रदान करण्यासाठी चतु:संप्रदाय खालशाची मंजुरी घ्यावी लागते. खालशात चतु:संप्रदाय वरिष्ठ खालसा आहे. त्यामुळे चतु:संप्रदाय खालशाच्या ध्वजारोहणानंतरच इतर खालशात ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. आखाड्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या मानपान नाट्यानंतर आता खालशाच्या ध्वजारोहणातही मानपानाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. आखाड्याच्या ध्वजारोणांनतर खालशांनी ध्वजारोहणास सुरवात केली आहे. दोन दिवसांत आठ ते दहा खालशात ध्वजारोहण सोहळा पार पडला आहे. मात्र चतु:संप्रदाय खालशाचे ध्वजारोहण महंतांच्या आगमनामुळे लांबले होते. ध्वजारोहणाला चतु:संप्रदायाचे महंत बर्फानी दादाजी, महंत फुलडोलदास बिहारी महाराज, महंत रामलखनदास महाराज, महंत रासबिहारीदास महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज उपस्थित राहणार आहेत.
( प्रतिनिधी)

त्या खालशांना दंड करणार
चतु:संप्रदाय खालशात ध्वजारोहण झाल्याशिवाय इतर कोणत्याही खालशात ध्वजारोहण होत नाही असा नियम आहे. मात्र याबाबत माहिती नसल्याने काही खालशांमध्ये ध्वजारोहण झाले. मात्र ज्या खालशांनी ध्वजारोहण केले. त्यांना दंड देण्यात येणार आहे. परंपरा माहिती करून न घेता खालशांनी ध्वजारोहण करणे योग्य नाही.
महंत फुलडोलदास बिहारी महाराज, चतु:संप्रदाय खालसा