शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

एसबीआय कार्डद्वारे आता चेक व्यवहारांवर आकारलं जाणार शुल्क

By admin | Updated: April 18, 2017 17:02 IST

मोदींच्या या निर्णयानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं क्रेडिट कार्डनं करण्यात येणा-या इतर बँकांच्या चेक व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 - गेल्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन व्यवहार करण्याचं नागरिकांना जोरदार आवाहन केलं होतं. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑनलाइन व्यवहारांवरील सेवाकरावरही काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र आता मोदींच्या या निर्णयानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं क्रेडिट कार्डनं करण्यात येणा-या इतर बँकांच्या चेक व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2 हजारांपेक्षा कमी रकमेचा चेक बँकेत टाकल्यानंतर तो वटवण्यासाठी तुमच्याकडून 100 रुपये शुल्क आकारणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे चेकच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना भुर्दंड पडणार आहे. क्रेडिट कार्डानं केलेल्या खरेदीचे पैसे चुकवण्यासाठी निर्धारित तारखेला ग्राहकांकडून बँकेत चेक जमा केले जातात. ब-याचदा पैसे भरण्याची तारीख निघून गेलेली असल्यानं विलंब शुल्क भरण्यावरून ग्राहक आणि बँक कर्मचा-यांमध्ये वाद होतात. याच पार्श्वभूमीवर चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारणार असल्याचे बँकेनं जाहीर केलं आहे. 2000 पेक्षा कमी रकमेचा चेक वटवण्यासाठी हे जास्तीचं हे शुल्क आकारलं जाणार आहे. मात्र तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असल्यास आणि एसबीआयच्याच चेकद्वारे पैसे भरल्यास तुम्हाला हे शुल्क लागू होणार नाही, असंही बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.एसबीआय कार्डची नोंदणी बँक म्हणून न होता फायनान्स कंपनी म्हणून झाली आहे. चेक वटवण्यासाठी ही कंपनी ग्राहकांकडून पैसे आकारते. बँकेच्या या निर्णयामुळे बिल भरणाऱ्यांना मोठा फटका बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.