शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया आणि राहुल गांधींवरील आरोप खोटे

By admin | Updated: December 13, 2015 22:35 IST

नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केले जात असलेले आरोप सपशेल खोटे, चिथावणीजनक आणि केवळ बदनामी करण्यापोटी हेतुपुरस्सर रचलेले आहेत,

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केले जात असलेले आरोप सपशेल खोटे, चिथावणीजनक आणि केवळ बदनामी करण्यापोटी हेतुपुरस्सर रचलेले आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि अश्विनीकुमार यांनी रविवारी स्पष्ट केले.हेराल्ड खरेदी प्रकरणातील सर्व व्यवहार कायदेशीर असून, सोनिया आणि राहुल गांधी न्यायालयीन प्रक्रियेतून पूर्णपणे निर्दोष सिद्ध होतील. या व्यवहारात काहीही गैर नसून नुकसानीत असलेल्या कंपनीला सर्वाधिक शेअर देत या संपत्तीतील एकही रुपया खासगी लाभार्थ्यांकडे जाऊ नये, अशी दक्षता घेण्यात आली आहे, असे सांगत चिदंबरम यांनी असोसिएट जर्नल्स लिमिटेडचे (एजीएल) शेअर यंग इंडिया कंपनीकडे हस्तांतरित करण्याच्या व्यवहाराचे समर्थन केले. या कंपनीत सोनिया आणि राहुल गांधी हे मुख्य भागधारक आहेत.बंद झालेले हे प्रकरण पुन्हा सुरू करताना मोदी सरकारने एका खासगी तक्रारीचा आधार घेताना घिसाडघाई केली आहे. एजीएलची संपत्ती आता दुप्पट सुरक्षित बनली आहे, असा दावाही चिदंबरम यांनी केला. काँग्रेस नेत्यांवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आणि बदनामीकारक आहेत. हा संपूर्ण व्यवहार कायदेशीररीत्या पार पडलेला आहे, असे अश्विनीकुमार यांनी एका निवेदनात स्पष्ट केले.