तोंडावर ॲसिड फेकल्याचा आरोप
By admin | Updated: March 21, 2016 00:21 IST
जळगाव : पत्नी नांदायला येत नसल्याने तिला माहेरी घेण्यासाठी गेलो असता पत्नी, सासू व मेव्हणी यांनी आपल्या अंगावर ॲसिड फेकल्याचा आरोप पती कैलास राजू चौधरी (रा.चौघुले प्लॉट) यांनी केला आहे.
तोंडावर ॲसिड फेकल्याचा आरोप
जळगाव : पत्नी नांदायला येत नसल्याने तिला माहेरी घेण्यासाठी गेलो असता पत्नी, सासू व मेव्हणी यांनी आपल्या अंगावर ॲसिड फेकल्याचा आरोप पती कैलास राजू चौधरी (रा.चौघुले प्लॉट) यांनी केला आहे. चौधरी भाजले गेल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी चार वाजता चौघुले प्लॉटमधील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली.