नंदनवनमध्ये चेनस्नॅचिंग
By admin | Updated: June 2, 2015 00:03 IST
नागपूर : फिरायला निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत दोन आरोपींनी हिसकावून नेली.
नंदनवनमध्ये चेनस्नॅचिंग
नागपूर : फिरायला निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत दोन आरोपींनी हिसकावून नेली. पंचफुला पद्माकर दुरुगकर (वय ६०, रा़ डायमंडनगर) या रविवारी सायंकाळी ५.१५ वाजता फिरायला निघाल्या. रमना मारोती चौक ते दिघोरी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवरील दोन आरोपींनी दुरुगकर यांच्या गळ्यातील पोत हिसकावून नेली. नंदनवन पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.---