शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

काळानुरुप कार्यशैली बदला

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

राज ठाकरेंची पाठशाला : कार्यकर्त्यांना सल्ला

राज ठाकरेंची पाठशाला : कार्यकर्त्यांना सल्ला
पिंपरी : वॉर्डात समाजकारण कसे करावे, लोकांशी संपर्क कसा ठेवावा, समाजातील प्रतिष्ठित लोकांशी वैयक्तिक संपर्क कसा वाढवावा आदीबाबत मार्गदर्शन करीत, जुन्या पद्धतीने काम करणे सोडून नव्या युगातील तरुणाईला बदलत्या परिस्थितीनुसार कार्यशैली आत्मसात करावी, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. बर्‍याच मोठ्या कालावधीनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये वेळ देण्यासाठी ते आवर्जून आले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. ठाकरेंची ही पाठशाला चिंचवड येथे सोमवारी सुमारे साडेतीन तास चालली.
विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ठाकरे यांनी राज्यातील काही शहरांचा दौरा केला. पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा शिल्लक होता. तो सोमवारी घाईघाईतच पूर्ण झाला. चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये बंद दाराआड त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची पाठशाला घेतली.
सकाळी सव्वादहाच्या सुमारास त्याचे चिंचवड येथे आगमन झाले. वरिष्ठ पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन प्रथम चिंचवड विधानसभा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दुसर्‍या टप्प्यात पिंपरी व भोसरी विधानसभा मतदारसंघाचा एकत्रितपणे संवाद झाला. या वेळी मावळ मतदारसंघाचे पदाधिकारीही उपस्थित होते.
पक्ष, अडचणी आणि समस्यांबाबत विचारलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. लेखी निवेदन स्वीकारले. पदाधिकार्‍यांशी ओळख करून घेऊन, विभाग आणि वॉर्डाची लोकसंख्या पाठोपाठ मतदारसंख्या विचारली.
'वॉर्डातील लोकांचे मोबाईल क्रमांक मिळवा. कोणाचा कधी वाढदिवस आहे, आदी माहिती संग्रहित करा. या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क ठेवा. त्याच्या सुख-दु:खात सहभागी व्हा. समाजातील प्रतिष्ठित लोकांशी स्नेहाचे संबंध ठेवा. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पत्रकार, पोलीस आदींशी वैयक्तिक संबंध ठेवा. माध्यमाशी अधिक जवळीक निर्माण करा. पुस्तक आणि वृत्तपत्राचे नियमित आणि अभ्यासपूर्वक वाचन करा,'असा सल्ला त्यांनी दिला.
'सध्याचे राजकारण हे जास्तीत जास्त पुढील १० वर्षे टिकून राहील. नवी पिढी खूपच बदलली आहे. त्यांच्या पद्धतीने काम करण्याची तयारी करुन घ्या अन्यथा ते उभेसुद्धा करणार नाहीत,' असा इशारा त्यांनी दिला.
'वाढदिवसाचे फ्लेक्स न लावण्याचे सांगितले आहे. तरीही अनेक जण ऊठ-सूट फ्लेक्स लावत आहेत. स्वत:चे आणि दुसर्‍याचे मोठमोठे फ्लेक्स झळकतात. चांगल्या लोकांच्या वाढदिवसाची तारीख नागरिकांना माहिती असते. वाढदिवसापेक्षा केलेल्या कामाचे फ्लेक्स लावा, अशी ताकीद त्यांनी दिली.
----