वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याबदल्या
By admin | Updated: February 11, 2015 23:47 IST
वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याबदल्या
वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या नागपूर : भारतीय वनसेवा व महाराष्ट्र वनसेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधीचे शासकीय आदेश बुधवारी जारी करण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या प्रतिनियुक्तीवरून परत आलेले ए.आर. चढ्ढा यांना अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व अतिरिक्त महासंचालक (नियोजन आणि मूल्यांकन) सामाजिक वनीकरण संचालनालय पुणे येथे नियुक्त करण्यात आले आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संवर्धन) नागपूरचे व्ही.डी. चाफेकर यांची अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्ययोजना) पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन पर्यटन व वन्यजीव प्रशासन) नागपूरचे विनय सिन्हा यांची अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संवर्धन) नागपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य वनसंरक्षक (नियोजन व विकास) एन. रामबाबू यांची अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन पर्यटन व वन्यजीव प्रशासन) नागपूर येथे, प्रतिनियुक्तीवरून परत आलेले सर्फराज खान यांची मुख्य वनसंरक्षक व उपमहासंचालक सामाजिक वनीकरण पुणे येथे आणि वन विभागाचे माहिती व जनसंपर्क अधिकारी (वने) कमलाकर धामगे यांची पुसद येथे उपवनसंरक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.