शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election Results 2018- चामराजनगर सिद्धरामय्यांंना भोवले?, तेथे भेट देणाऱ्याचे मुख्यमंत्रीपद जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 04:26 IST

कर्नाटकमध्ये पाच वर्षांची कारकिर्द पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री म्हणजे देवराज अर्स. त्यानंतर, सिद्धरामय्या यांनीच पाच वर्षे पूर्ण केली, पण त्या दोघांत आणखी एक साम्य आहे. ते म्हणजे चामराजनगरचा कथित पायगुण. चामराजनगरला भेट दिल्यानंतर दोघांचेही मुख्यमंत्रीपद गेले.

बंगळुरु : कर्नाटकमध्ये पाच वर्षांची कारकिर्द पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री म्हणजे देवराज अर्स. त्यानंतर, सिद्धरामय्या यांनीच पाच वर्षे पूर्ण केली, पण त्या दोघांत आणखी एक साम्य आहे. ते म्हणजे चामराजनगरचा कथित पायगुण. चामराजनगरला भेट दिल्यानंतर दोघांचेही मुख्यमंत्रीपद गेले.पाच वर्षांत सिद्धरामय्या नऊ वेळा चामराजनगरला गेले. मुख्यमंत्रीपदी पाच वर्षे राहायचे असेल, तर त्याने या शहराला भेट द्यायला हवी, असेही त्यांनी बोलून दाखविले होते, पण त्या शहराला भेट देणाºया प्रत्येक मुख्यमंत्र्याला नंतर सत्ता सोडावी लागली, हा इतिहास आहे. त्यामुळे चामराजनगरचा दौरा सिद्धरामय्या यांनाही भोवला. असाच अनुभव देवराज अर्स यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले गुंडू राव, रामकृष्ण हेगडे, एस. आर. बोम्मई, वीरेंद्र पाटील यांनाही आला.चामराजनगरला भेट देणाºया मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाते, असे वारंवार घडले आहे. त्यामुळे या शहराला ‘मुख्यमंत्र्यांची दफनभूमी’ म्हटले जाते. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री असताना चामराजनगरला भेट दिली होती. तिथे जाऊ नका, असे त्यांना सांगण्यात आले होते, पण त्यांनी ऐकले नाही आणि २० महिन्यांत त्यांचा कारभार आटोपला.नंतर मुख्यमंत्री झालेले येडियुरप्पा व सदानंद गौडा यांनी चामराजनगरमध्ये पाऊल ठेवायचे धाडस केले नाही. पुढे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी २०१३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या आधी चामराजनगरचा दौरा केला. त्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळून सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले. (वृत्तसंस्था)>मोदींनीहीजाण्याचे टाळलेयंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या, पण तेही चामराजनगरला गेले नाहीत. आपले पंतप्रधानपद जाईल, या भीतीने मोदी यांनी असे केले असावे, अशी टीका सिद्धरामय्या यांनी केली होती. मात्र, चामराजनगरच्या बाणाने अखेर सिद्धरामय्या यांनाच घायाळ केले. काँग्रेसचा पराभव होऊन त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले.

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८