शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठांपुढे संकुचित विचारांचे आव्हान

By admin | Updated: March 26, 2017 00:33 IST

भारतात विद्यापीठांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोर संकुचित विचारसणीचे आव्हान असून

चंदिगढ : भारतात विद्यापीठांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोर संकुचित विचारसणीचे आव्हान असून ‘मुक्त अवकाश’ आणि उदारमतवादी मूल्यांच्या नवीनीकरणाचे स्रोत म्हणून त्यांचा बचाव करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी शनिवारी येथे केले. विद्यापीठे लोकांसाठी सामाजिक गतिशीलता आणि समानतेच्या संधी उपलब्ध करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बौद्धिक अविश्वासाच्या या काळात मुक्त अवकाश, ज्ञानाचे खजिने आणि उदार मूल्यांच्या नवीनीकरणाचे स्रोत म्हणून त्यांचा बचाव करणे अत्यावश्यक आहे, असे ते पंजाब विद्यापीठाच्या ६६ व्या दीक्षान्त सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले. देशातील अलीकडच्या घटनांचा थेट उल्लेख न करता उपराष्ट्रपती म्हणाले की, विद्यापीठ कसे असावे आणि कसे नसावे, याबाबत संभ्रम असल्याचे दिसून येते. विद्यापीठांच्या स्वातंत्र्याला जनहिताच्या नावाखाली संकुचित विचारांकडून आव्हान देण्यात आले आहे. आमच्या घटनेत असहमती आणि आंदोलनाच्या हक्काचा मूलभूत हक्कांत समावेश आहे. हा हक्क संकुचित, धार्मिक आणि वैचारिकतेच्या आधारे देशाची व्याख्या करण्यास मनाई करतो. गैरवर्तणूक किंवा हिंसाचाराची प्रकरणे वगळता कोणत्याही विद्यापीठाने आपले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विशिष्ट भूमिका घेण्यास किंवा एखाद्या भूमिकेला विरोध करण्यास भाग पाडायला नको. वास्तविक विद्यापीठांनी आपली शैक्षणिक अखंडता अणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असेही अन्सारी म्हणाले.(वृत्तसंस्था)बौद्धिक स्वातंत्र्याला चालना मिळावीदिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये अभाविप आणि डाव्यांशी संलग्न एआयएसए या संघटनांत झालेल्या राड्यांसह इतर शिक्षण संस्थांतील ताज्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी हे खडे बोल सुनावले. विद्यापीठाने बौद्धिक स्वातंत्र्याला चालना मिळेल, असे वातावरण तयार केले पाहिजे. बौद्धिक असंतोषात मतभेद तसेच प्रतिस्पर्ध्यांची समज स्पष्ट करण्याचे सामर्थ्य आहे. यामुळे आम्हा सर्वांना आपल्या विचारांतील सामर्थ्य आणि कमकुवतता ओळखण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.