शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी टिकविण्याचे आव्हान

By admin | Updated: April 20, 2016 03:09 IST

बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने संपूर्ण दारुबंदीची घोषणा केल्यानंतर आता सरकारसमक्ष ही बंदी टिकवून ठेवण्याचे फार मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

एस.पी. सिन्हा, पाटणाबिहारमध्ये नितीशकुमार सरकारने संपूर्ण दारुबंदीची घोषणा केल्यानंतर आता सरकारसमक्ष ही बंदी टिकवून ठेवण्याचे फार मोठे आव्हान उभे ठाकले आहे.बिहार सीमेलगतच्या इतर राज्यांमधून बेकायदेशीरपणे येणारी आणि विकली जाणारी दारू रोखण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असतानाच कफ सिरप आणि झोपेच्या गोळ्यांची विक्रीही प्रचंड वाढली आहे.व्यसनाधीन तरुण व इतर लोक या औषधांचा खुलेआम वापर करीत आहेत. बेनाड्रील, फेंसाड्रील आदी कफ सिरपची तर आता ब्लॅकमध्ये विक्री होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे झोपेच्या गोळ्यांचीही मागणी वाढली आहे. नशा करणारे आता याच गोष्टींवर आपली तहान भागवत आहेत. दुसरीकडे झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि नेपाळलगतच्या जवळपास सर्व जिल्ह्णांच्या अनेक शहरांमध्ये शेजारून येणाऱ्या दारूची लपूनछपून विक्री सुरू आहे. अथवा लोक स्वत: सीमा भागात जाऊन मद्यप्राशन करीत आहेत. थोडक्यात संपूर्ण दारुबंदीनंतरही या क्षेत्रातील लोकांना अगदी सहजपणे दारू उपलब्ध होत आहे. नेपाळलगतच्या रक्सौल, मधुबनी, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण या जिल्ह्णांमध्ये सुद्धा सीमा सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांसमक्ष मद्य तस्करी रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शेजारील राज्यांना दारुबंदीच्या अंमलबजावणीत सहकार्याचे आवाहन केले आहे. परंतु समस्या ही आहे की तेथे दारुबंदीच नाही मग तेथील सरकार यावर आळा कसा घालणार?दुसरीकडे झारखंडला लागून असलेल्या नवादा, नालंदा जिल्ह्याचे लोक रजौली मार्गे शेजारील राज्याच्या सीमेवरील ढाबे व हॉटेल्समध्ये जाऊन मद्यप्राशन करीत आहेत. भागलपूरचा इशुपूर वा बाराहाट बाजार अर्धा बिहार आणि अर्धा झारखंडमध्ये पडतो. त्यामुळे गैरप्रकार रोखणे अथवा धाडी घालणे जवळपास अशक्य आहे.