सरस्वती नगरात तरुणावर चाकु हल्ला
By admin | Updated: March 28, 2016 01:13 IST
जळगाव: कासमवाडीतील सरस्वती नगरात रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास बारा तरुणांनी धुडगूस घालत कनीराम देवराम काजळे (वय १८ मुळ रा.कंडई जि.खंडवा मध्यप्रदेश) या तरुणावर चाकू हल्ला केला. काजळे व त्याचे चार मित्र संध्याकाळी घरी स्वयंपाक करीत असताना बारा तरुण त्यांच्या दिशेने चालत आले. बाहेर बसलेल्या नेरु याला मारहाण करुन खुर्ची घेवून गेले.ही खुर्ची घेण्यासाठी गेलेल्या काजळे याच्यावर त्यांनी खुर्ची हानून फेकली तर एकाने त्याच्या हातावर चाकूने वार केला. सहकार्यांनी त्याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. काजळे व त्याचे मित्र टेन्ट हाउसच्या दुकानावर कामाला आहेत. भाड्याने खोली घेवून ते सरस्वती नगरात राहतात. हल्लेखोर तरुणांना कधीही पाहिले नाही, असे काजळे याने लोकमत ला सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे कासमवाडी परिसरात तणाव निर्माण झाला होता.