शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: कोविशिल्ड की कोवॅक्सिन? सर्वसामान्यांना लस निवडता येणार?; जाणून घ्या...

By कुणाल गवाणकर | Updated: January 12, 2021 17:37 IST

देशात कोरोशिल्ड, कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. काल दिवसभरात देशात १३ हजारांहून कमी रुग्ण आढळून आले. त्यामुळे देश लवकरच कोरोना संकटातून बाहेर पडू लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यातच आता कोरोना लसीकरणाची तयारीदेखील वेगानं सुरू झाली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून देशातल्या विविध राज्यांमध्ये कोरोनाची लस पाठवली गेली आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्सना कोरोनावरील लस देण्यात येईल. त्यानंतर पन्नाशी पार केलेल्या, गंभीर आजारांचा सामना करत असलेल्यांना लस टोचण्यात येईल. सध्याच्या घडीला सीरमच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. दोन्ही लसी भारतातच तयार झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांनादेखील याच लसी मिळतील. कोविशील्ड, कोवॅक्सिन यापैकी कोणती लस घ्यायची याचा पर्याय लाभार्थ्याना असेल का, त्यांना दोनपैकी एका लसीची निवड करण्याचं स्वातंत्र्य असणार का, असे प्रश्न आज झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांना विचारण्यात आले. 'बऱ्याच देशांमध्ये एकापेक्षा जास्त लसी वापरल्या जात आहेत. मात्र तिथे लाभार्थ्याला असा पर्याय देण्यात आलेला नाही,' असं भूषण म्हणाले. त्यामुळे भारतातही लाभार्थ्याला लसीची निवड करता येणार नाही, अशी दाट शक्यता आहे.देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लसीकरणाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल उपस्थित होते. 'कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेबद्दल कोणतीही शंका नाही. हजारो नागरिकांवर त्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्यात आढळून आलेले साईड इफेक्ट्स अतिशय कमी आहेत,' असं पॉल म्हणाले. यावेळी त्यांनी कोरोनावरील लस तयार केल्याबद्दल सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकचे आभार मानले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस