शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

CoronaVirusVaccination: मोठी बातमी! खासगी रुग्णालयात कोरोना लशीच्या एका डोससाठी द्यावे लागणार 250 रुपये - केंद्र सरकार

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 27, 2021 19:49 IST

आता खासगी रुग्णालयांतून करण्यात येणाऱ्या लसिकरणासंदर्भातही चित्र स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने शनिवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की कोरोना लसिकरण केंद्र म्हणून काम करणाऱ्या खासगी रुग्णालयांत प्रति व्यक्ती प्रती डोससाठी 250 रुपये घेतले जातील. (covid 19 vaccine in private hospitals)

ठळक मुद्देकोरोना लसिकरण केंद्र म्हणून काम करणाऱ्या खासगी रुग्णालयांत प्रति व्यक्ती प्रती डोससाठी 250 रुपये घेतले जातील.देशातील सरकारी रुग्णालयांत कोरोना लसिकरण मोफत होईल, असे सरकारने पूर्वीच स्पष्ट केले आहे.केंद्र सरकारच्या निर्णयापूर्वीच गुजरात सरकारने खासगी रुग्णालयांसाठी लशीच्या डोसची किंमत निश्चित केली होती.

नवी दिल्ली - देशातील सरकारी रुग्णालयांत कोरोना लसिकरण मोफत होईल, असे सरकारने पूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, आता खासगी रुग्णालयांतून करण्यात येणाऱ्या लसिकरणासंदर्भातही चित्र स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने शनिवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की कोरोना लसिकरण केंद्र म्हणून काम करणाऱ्या खासगी रुग्णालयांत प्रति व्यक्ती प्रती डोससाठी 250 रुपये घेतले जातील. (Central govt fixed price of covid 19 vaccine in private hospitals costs Rs 250 per person per dose)

केंद्र सरकारच्या निर्णयापूर्वीच गुजरात सरकारने खासगी रुग्णालयांसाठी लशीच्या डोसची किंमत निश्चित केली होती. यानुसार, येथील खासगी रुग्णालयांतही कोरोनाचा डोस 250 रुपयांना मिळणार आहे. तर सरकारी रुग्णालयात हा डोस मोफत मिळेल.

Covid-19 vaccine pill : दिलासादायक! आता कोरोनापासून बचाव करणं आणखी सोपं होणार; टॅबलेटमध्ये मिळू शकते लस

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू आणि गुजरातमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यांपैकी महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक वेगाने वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,488 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान 113 रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात 11 लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

अ‍ॅपवर द्या वयाचा पुरावा - देशातील ६० वर्षांवरील सर्वांना व व्याधी असलेल्या ४५ वर्षे वयावरील लोकांना १ मार्चपासून कोरोना लस देण्यात येणार आहे. मात्र लस घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रथम ‘को-विन’ अ‍ॅप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून नावाची नोंदणी करावी लागेल. या वयोगटातील लोकांना लस देण्यासाठी देशात ३० हजार केंद्रे आहेत. त्यापैकी १० हजार सरकारी केंद्रांत मोफत लस दिली जाणार आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारhospitalहॉस्पिटल