शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांच्या चोख बंदोबस्तासाठी केंद्र सरकारची ८ सूत्री नवी रणनीती

By admin | Updated: May 8, 2017 20:49 IST

नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे देशात गेल्या 20 वर्षात 12 हजारांहून अधिक लोक ठार झालेत.

ऑनलाइन लोकमत/सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 8 - नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे देशात गेल्या 20 वर्षात 12 हजारांहून अधिक लोक ठार झालेत. देशातल्या 10 राज्यातले 68 जिल्हे नक्षलग्रस्त असले तरी नक्षलवाद्यांच्या 90 टक्के हल्ल्यांचे केंद्रीकरण सध्या मुख्यत्वे 35 जिल्ह्यात आहे. नक्षल समस्येतून देशाची सुटका करण्यासाठी कोणताही शॉर्टकट उपयुक्त नाही, दीर्घकालीन उपायांचाच अवलंब करावा लागणार आहे, असे स्पष्ट करीत गृहमंत्री राजनाथ सिंगांनी देशातल्या नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत 8 सूत्री रणनीतीची घोषणा केली.नक्षलग्रस्त विभागांसाठी गृहमंत्र्यांनी सुचवलेल्या 8 सूत्री रणनीतीत कुशल नेतृत्व, आक्रमक रणनीती, प्रोत्साहन व प्रशिक्षण, चौकस गुप्तचर यंत्रणा, प्रत्यक्ष कारवाईचे आधुनिक मानदंड, परिणामकारक तंत्रज्ञान, नक्षलवाद्यांचे आर्थिक स्त्रोत (फंडिंग) ची नाकेबंदी, प्रत्येक अ‍ॅक्शन प्लॅनसाठी भिन्न रणनीती, या मुद्यांचा समावेश आहे. लक्ष्याची एकता या स्वरूपात राज्य सरकारांनी या 8 सूत्री रणनीतीला स्वीकारावे, असा आग्रह गृहमंत्र्यांनी बैठकीत केला.आक्रमक रणनीतीचे स्पष्टीकरण करतांना गृहमंत्री बैठकीत म्हणाले, नक्षलवाद्यांच्या विरोधात प्रत्येक आॅपरेशनचे नेतृत्व राज्य सरकारने करावे, निमलष्करी दल त्याला सक्रिय मदत करील. प्रत्येक बटालियनजवळ मानव रहित विमाने (अनमॅन्ड एरिअल व्हेईकल) (युएव्ही) मोठ्या किंवा मिनी आकारांची असणे अत्यावश्यक आहे. युएव्हीचा वापर सध्या अतिशय कमी प्रमाणात आहे, तो वाढवायला हवा. गुप्तचर यंत्रणा व सुरक्षा दलांनी स्थानिक जनतेशी संपर्क साधून संदेशांचे परिणामकारक नेटवर्क उभारण्याची गरज आहे. नक्षल समस्येतून मार्ग काढण्यासाठी कोणतीही अल्पकालिन उपाययोजना प्रभावी ठरत नसल्याने या संघर्षात शॉर्ट टर्म, मीडियम टर्म अँड लाँग टर्म अशा त्रिस्तरिय रणनीतीचा अवलंब करावा लागेल. नक्षलग्रस्त भागात वाहतुकीसाठी उत्तम दर्जाच्या रूंद रस्त्यांची बांधणी, आवश्यक स्थळांवर सुरक्षा दलांची तैनाती तसेच विकास कार्ये पूर्ण करण्यातही कमालीचीआक्रमकता दाखवण्याची आवश्यकता आहे असे गृहमंत्री म्हणाले. बंदुकांच्या धाकाने विकास प्रकिया रोखणाऱ्या नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी 10 नक्षलग्रस्त राज्यांच्या एकात्मिक नेतृत्वाला कार्यरत करून, संयुक्त रणनीतीचा अवलंब करण्यावर भर देत गृहमंत्री म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने नक्षलवाद्यांची ठिकाणे शोधून काढली, नव्या रणनीती नुसार सर्व शक्तिनिशी या हल्लेखोरांशी संघर्ष केला तर आपण नक्कीच यशस्वी ठरू शकतो, असा विश्वासही गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.छत्तिसगडातील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अलीकडेच निमलष्करी दलाचे 25 जवान ठार झाले. या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री राजनाथसिंग यांनी नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी नवी रणनीती ठरवण्यासाठी देशातल्या 10 नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सोमवारी दिल्लीत बैठक आयोजित केली होती बैठकीला छत्तिसगड, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, उत्तरप्रेश, बिहार असे 10 पैकी 6 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे चंद्रशेखर राव आणि मध्यप्रदेशचे शिवराजसिंग चौहान विविध कारणांमुळे बैठकीला उपस्थित नव्हते.