शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

काश्मिरातील हिंसाचार प्रकरणी केंद्र सरकार गाफील

By admin | Updated: August 4, 2016 04:10 IST

काश्मीरमधील हिंसाचाराची धग कायम असून, मंगळवारी पुन्हा दोन आंदोलकांचा मृत्यू झाला.

श्रीनगर : काश्मीरमधील हिंसाचाराची धग कायम असून, मंगळवारी पुन्हा दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. दरम्यान, काश्मीरमधील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार गाफील असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी केला. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर यांनी टिष्ट्वट केले आहे की, काल दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना अजूनही यात गांभीर्य वाटत नाही; पण केंद्र सरकारही एवढे गाफील कसे? असा सवालही ओमर यांनी केला आहे. पुलवामा जिल्ह्याच्या लेथपुरा भागात मंगळवारी रात्री आंदोलकांनी एका सरकारी अधिकाऱ्याची जीप जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्याने गोळीबार केला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दुसरा इसम गंभीर जखमी झाला. काश्मिरात संचारबंदी वाढविली काश्मिरात मंगळवारी रात्री झालेल्या हिंसक आंदोलनानंतर येथे संचारबंदी वाढविण्यात आली आहे. पुलवामा जिल्ह्यात अनेक जण या आंदोलनात जखमी झाले आहेत. एका हॉस्पिटलच्या बाहेर रेयाज अहमद या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर छर्ऱ्याच्या खुणा होत्या. त्यानंतर जमाव संतप्त झाला. शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप आला नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संचारबंदी आतापर्यंत जुन्या शहराच्या पाच पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात होती. आता बटमालू, शहीदगंज, सौर, जदिबल, कमरवारी आणि बेमिना या भागांत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. तथापि, बारामुल्ला जिल्ह्याच्या खानपुरा भागात, पुलवामाच्या अवंतिपुरा व पंपोरमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)>संयुक्त राष्ट्र म्हणते, एलओसीपलीकडील क्षेत्र आमच्या अधिकारात नाही एलओसीपलीकडील (नियंत्रण रेषा) क्षेत्र आमच्या अधिकार क्षेत्रात नाही, असे स्पष्टीकरण संयुक्त राष्ट्र संघाने दिले आहे. संयुक्त राष्ट्राने यापूर्वी स्पष्ट केले होते की, भारत आणि पाकिस्तानमधील आपल्या निरीक्षक गटाकडून (यूएनएमओजीआयपी) आपण काश्मीरवर नजर ठेवून आहोत. याच वक्तव्यावरून संयुक्त राष्ट्र संघाने आता यू टर्न घेतला आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच उप प्रवक्ते फरहान हक यांनी सांगितले होते की, संयुक्त राष्ट्र आपल्या निरीक्षकांच्या गटामार्फत काश्मीरच्या परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवणार आहे. दरम्यान, भारताचे सातत्याने हेच म्हणणे आहे की, सिमला करारानंतर यूएनएमओजीआयपीचे महत्त्व संपले आहे.