शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या अशांततेला केंद्र सरकार जबाबदार

By admin | Updated: June 5, 2017 04:13 IST

जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची अशांतता आणि अस्वस्थतेचा ठपका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर ठेवला

लोकमत न्यूज नेटवर्कचेन्नई : जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची अशांतता आणि अस्वस्थतेचा ठपका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर ठेवला. ते रविवारी येथे म्हणाले, ‘केंद्र सरकार काश्मीरचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळत असून, भाजप-पीडीपी ही काश्मीरमधील युती ‘अकार्यक्षम’ आहे. काश्मीर खोऱ्यात शांतता निर्माण करू हे दिलेले आश्वासन पोकळ ठरले आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी अरुण जेटली मला भेटायला आले होते. तुम्ही काश्मीरचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळत आहात व काश्मीरला आगीच्या तोंडी उभे करीत आहात, असे मी त्यांना सांगितले.जेटली यांनी माझे म्हणणे दूर सारून काश्मीरमध्ये शांतता असल्याचे सांगितले, असे राहुल गांधी म्हणाले. भारत सरकार आणि पंतप्रधान काश्मीरचा प्रश्न पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने हाताळत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. देशावर एकच विचार लादण्याचा व देशाची विविधता धोक्यात आणण्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव विरोधी पक्ष एक होऊन उधळून लावतील. देशावर एकच विचार थोपावला जातोयप्रत्येक राज्याला स्वत:चा विचार आणि संस्कृती, अभिव्यक्ती आणि खानपान आहे. ही विविधता हेच देशाचे बळ आहे, दुबळेपणा नाही, असे राहुल गांधी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. जी शक्ती आहे तो भाजपसाठी दुबळेपणा आहे व वेगवेगळ्या कल्पना तो नष्ट करू पाहतोय. देशावर एकच विचार थोपवता येईल, असा विचार तो करतोय, असा आरोप त्यांनी केला.