शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने अहवाल मागितला

By admin | Updated: February 18, 2016 06:37 IST

जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देशविरोधी आणि अफझल गुरू याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली असतानाच केंद्र सरकारने प. बंगाल सरकारकडून अहवाल मागितला आहे

कोलकाता : जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देशविरोधी आणि अफझल गुरू याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली असतानाच केंद्र सरकारने प. बंगाल सरकारकडून अहवाल मागितला आहे. कुलगुरू सुरंजन दास यांनी मात्र काढण्यात आलेली रॅली अधिकृत नव्हती आणि तिचा विद्यार्थी संघटनेशी संबंध नव्हता आणि रॅलीत देशविरोधी घोषणाही देण्यात आल्या नव्हत्या, असा खुलासा केला आहे.विद्यार्थ्यांनी काढलेल्या निषेध मार्चसंबंधी परिस्थिती आणि घटनाक्रमाचा संपूर्ण तपशील सादर करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने प. बंगाल सरकारला दिला आहे. मंगळवारी संध्याकाळी जादवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कन्हय्या कुमारला पाठिंबा देण्यासाठी मार्च काढत अफझल गुरू, बनावट चकमकीत मारली गेलेली इशरत जहाँ हिच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचे वृत्त आहे. विद्यापीठाच्या परिसरात काश्मीर, मणिपूर आणि नागालँडच्या स्वातंत्र्याची मागणी करणारी पोस्टर्स आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. ‘हम क्या चाहे... आझादी’. ‘काश्मीर की आझादी, मणिपूर की आझादी, नागालँड की आझादी’ अशा घोषणा लिहिलेले पोस्टर्स विद्यापीठाच्या परिसरात आढळून आले. रॅडिकल अशी स्वाक्षरी केलेल्या गटाने हे पोस्टर्स टाकले. आम्ही हे पोस्टर्स टाकलेले नाहीत, असा दावा विद्यार्थी संघटनेचा एक नेता सौनक मुखर्जी याने केला.स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाचे (एसएफआय) प्रदेश सचिव देबोज्योती दास यांनी जादवपूर विद्यापीठात अफझल गुरूच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या घोषणांशी संबंध असल्याचा इंकार केला आहे. तिथे दिल्या गेलेल्या घोषणांना आमचा पाठिंबा नसून, अशा बेजबाबदार कृत्यासाठी जादवपूर विद्यापीठातील संपूर्ण विद्यार्थी समुदायाला जबाबदार धरता येणार नाही, असे ते म्हणाले.