शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात जुलैपासून वाढ

By admin | Updated: June 10, 2017 03:27 IST

देशभरातील ५0 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या कर्मचाऱ्यांना जुलैपासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार भत्तेही मिळणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशभरातील ५0 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या कर्मचाऱ्यांना जुलैपासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार भत्तेही मिळणार आहेत. केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी यापूर्वीच केली. मात्र भत्त्यांचे प्रमाण ठरविण्यासाठी अशोक लवासा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने २७ एप्रिल रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपला अहवाल सादर केला. त्यात भत्त्यांमध्ये काही बदल सुचवले आहेत. आता ते भत्ते जुलैपासून लागू होणार आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांत २७ टक्के घरभाडे भत्ता मिळू शकेल. सातव्या वेतन आयोगाने २४ टक्क्यांची शिफारस केली होती. कर्मचाऱ्यांना सध्या मोठ्या शहरांमध्ये मूळ वेतनाच्या ३० टक्के घरभाडे भत्ता मिळत होता. मात्र सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनातच मोठी वाढ झाली असल्याने घरभाडे भत्त्याची रक्कम आपोआप वाढणार आहे. भत्त्यांसंबंधीच्या प्रस्तावांवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार भत्ते न देण्याचे टाळल्याने सरकारच्या तिजोरीवर दरमहा २२00 कोटी याप्रमाणे जानेवारी २0१६ पासून सुमारे ४0 हजार कोटी रुपयांचा भार हलका झाला होता. आता लवासा समितीच्या शिफारशींनुसार भत्ते मिळणार आहेत. इतर भत्त्यांबाबतही निर्णय मंत्रिमंडळाच्या या महिन्यातील बैठकीत होणे अपेक्षित आहे. या भत्त्यांमध्ये वाढीमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर भार पडणार आहे. मात्र ही रक्कम मिळाल्यामुळे कर्मचारी अधिक खर्च करतील आणि तो पैसा बाजारात येऊ न अर्थव्यवसथेला फायदा होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र भत्तेवाढीमुळे तिजोरीवर नेमका किती बोजा पडेल, हे स्पष्ट झालेले नाही.