शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रात फेरबदलाचे वारे!

By admin | Updated: April 7, 2017 06:20 IST

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करू शकतात

हरिश गुप्ता,नवी दिल्ली- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करू शकतात, अशी जोरदार चर्चा येथील राजकीय वर्तुळात आहे. नितीन गडकरी आणि सुरेश प्रभू यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक १५ आणि १६ एप्रिल रोजी ओडिशात होत असून, पक्षाची यंत्रणा महिनाअखेरीस दिल्लीतील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकीत व्यस्त राहणार आहे. त्यातच मे महिन्यात मोदी सरकारला तीन वर्षे होत आहेत. अशी सर्व पार्श्वभूमी असली तरी यादरम्यान मोदी मंत्रिमंडळात फेरबदल करू शकतात, असे राजकीय पंडितांना वाटते. अरुण जेटली संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळू इच्छित नसल्यामुळे तातडीने फेरबदल करण्याची निकड निर्माण झाली आहे. जेवढ्या लवकर ही जबाबदारी काढून घेतली जाईल तेवढे ते आपल्यासाठी चांगले, असे जेटलींनी पंतप्रधानांना कळविल्याचे समजते. मनोहर पर्रीकर गेल्या महिन्यात गोव्यात परतल्यापासून जेटलींकडे हा अतिरिक्त कार्यभार आहे. मोदी पुरेशा विचाराअंती मंत्रिमंडळात फेरबदल करतात. त्यामुळे निर्णयाप्रत येण्यास त्यांना वेळ लागतो, असे पंतप्रधान कार्यालयातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. आपल्या सरकारला २६ मे रोजी तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर मोदी कार्यकाळाचा कसून आढावा घेतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाला मुहूर्त लागेल, असे काहींना वाटते. मंत्रिमंडळातील फेरबदल जूनमध्ये किंवा जुलै-आॅगस्टमधील राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर होऊ शकतो. मात्र, आॅगस्टच्या मुहूर्ताची शक्यता अधिक आहे. मोदी यांनी महाराष्ट्रातील खासदारांसोबतच्या बैठकीत हे संकेत दिले. दरम्यान, स्वतंत्र प्रभार असलेले पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान आणि मनोज सिन्हा यासारख्या मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदी पदोन्नती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.>असे होऊ शकतात बदल...रस्ते वाहतूक आणि जहाजमंत्री नितीन गडकरी यांना संरक्षण मंत्रालयात आणून सुरक्षेवरील मंत्रिमंडळीय समितीचे सदस्य बनविले जाईल, अशी शक्यता आहे. मात्र गडकरी चांगले काम करीत आहेत. त्यांना हलवू नये, असाही मतप्रवाह आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत जेटलींनाच हे पद सांभाळावे लागेल किंवा मग जे.पी. नड्डा अथवा सुरेश प्रभू यांना संरक्षणमंत्री केले जाऊ शकते. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात आणले जाईल, अशीही चर्चा आहे. सुरेश प्रभू यांना संरक्षण मंत्रिपद दिले गेले तर वसुंधराराजेंकडे रेल्वे खाते जाऊ शकते. मात्र, भाजपमधीलच नेत्यांना राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत पुढील वर्षी निवडणुका होत असल्याने तेथील विद्यमान राजकीय घडीला धक्का लावू नये, असे वाटते.