शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही, रेडिओबाबत तक्रारींसाठी केंद्राने स्वतंत्र व्यवस्था करावी

By admin | Updated: January 13, 2017 01:03 IST

दूरचित्रवाणी आणि रेडिओवरील कार्यक्रमांविषयी नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची

नवी दिल्ली : दूरचित्रवाणी आणि रेडिओवरील कार्यक्रमांविषयी नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र घटनात्मक व्यवस्था तयार करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. सरन्यायाधीश जगदीश सिंग केहार आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (नियमन) कायद्याचे कलम २२ नुसार मिळालेला अधिकार वापरून, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ वाहिन्यांबद्दल नागरिक करीत असलेल्या तक्रारींच्या निराकरणासाठी मंडळ स्थापन करावे, असे म्हटले. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी यंत्रणा असल्याचे केंद्र सरकारने केलेले निवेदन न्यायालयाने विचारात घेतले. केंद्र सरकारचे म्हणणे असे होते की, तशी व्यवस्था आहे. तथापि, आम्हाला असे वाटते की, त्याला पुरेशी प्रसिद्धी मिळाल्यास सामान्य लोकांना त्यांच्या तक्रारीचे निराकरण करून घेता येईल. कॉमन कॉज या अशासकीय संस्थेच्या वतीने वकील प्रशांत भूषण बाजू मांडताना म्हणाले की, ‘स्वत:च स्वत:चे नियमन करण्यातून काहीही साध्य होत नाही.’ (लोकमत न्युझ नेटवर्क)