शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन खरेदी-विक्रीवर केंद्राचे निर्बंध

By admin | Updated: May 28, 2017 04:07 IST

केंद्र सरकारने जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने गुरांच्या बाजारात होण्याऱ्या विक्रीवर बंदी आणली असून, त्यानुसार गुरांची खरेदी करणाऱ्यांना आपण त्यांची कत्तल

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने गुरांच्या बाजारात होण्याऱ्या विक्रीवर बंदी आणली असून, त्यानुसार गुरांची खरेदी करणाऱ्यांना आपण त्यांची कत्तल करणार नाही, असे प्रतिज्ञापत्रच द्यावे लागणार आहे. मात्र यामुळे भाकड गायी कोण विकत घेणार, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण होणार आहे, तर दुसरीकडे एक लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेला देशातील मांस उत्पादन उद्योगच अडचणीत सापडणार आहे.या प्राण्यांची विक्री किंवा खरेदी करणाऱ्यांना आपण शेतकरी असल्याचे पुरावे व्यवहाराच्या वेळी सादर करावे लागतील. तसेच खरेदी व विक्री करणाऱ्यांना या जनावरांचा वापर कत्तलीसाठी करणार नाही, असे हमीपत्रही द्यावे लागेल. गुरांच्या कत्तली वा त्यांच्या मांसविक्रीवर बंदी यावी, या उद्देशाने हा नवा नियम करण्यात आलेला नाही, असे सरकार म्हणत आहे. पशुबाजार आणि तेथील व्यवहारांवर नियंत्रण यावे हा या नव्या नियमांमागील हेतू आहे, असे पर्यावरणमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. बकरा आणि मेंढ्या यांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. या प्राण्यांचा बळी देण्याची काही समाजांमध्ये प्रथा आहे.पशू व्यापाराऐवजी पशुधन वाढवणे, हा आमचा यामागील हेतू असल्याचे भाजपा नेत्यांनी सांगितले. - देशातील ईशान्येकडील राज्यांसह अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदी नाही. पण नव्या कायद्यामुळे त्या राज्यांमध्येही जनावरांच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध येणार आहेत. केरळ सरकारने केंद्राच्या या निर्णयाला विरोध केला असून, तिथे सत्ताधारी डावे पक्ष आणि विरोधात असलेला काँग्रेस या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. हा निर्णय अयोग्य असल्याचे केरळ सरकारने म्हटले आहे.- केंद्रीय पर्यावरण विभागाने गायी-म्हशी, बैल, कालवड, सांड, बछडे, उंट या प्राण्यांना कत्तलींसाठी गुरांच्या बाजारात विकता येणार नाही, असा आदेश काढला असून, तो सध्या तीन महिन्यांसाठी आहे. मात्र त्याचा फटका गरीब शेतकऱ्यांना व कत्तलखान्यांना बसणार आहे. गेल्या आठवड्यात याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली.