शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉर बोर्ड भ्रष्टाचार; बॉलीवूडचे सहकार्य नाही

By admin | Updated: September 13, 2014 02:19 IST

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून (सीईओ) चित्रपटांना मंजुरी देण्यासाठी होत असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी त्याच्यावर तीन महिने पाळत

नवी दिल्ली : केंद्रीय चित्रपट प्रमाणक मंडळातील (सेन्सॉर बोर्ड) वरिष्ठ वर्तुळात होत असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर या प्रकरणाच्या तपासकामात बॉलीवूडमधील लोकच सहकार्य करीत नसल्याने अनेक अडचणी येत असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून (सीईओ) चित्रपटांना मंजुरी देण्यासाठी होत असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी त्याच्यावर तीन महिने पाळत ठेवण्यात आली होती. केंद्रीय चित्रपट प्रमाणक मंडळ अर्थातच सेन्सॉर बोर्ड ही देशातील चित्रपट नियामक संस्था आहे जी चित्रपटांच्या विषयांवर नियंत्रण ठेवते व त्याला प्रमाणपत्र देते. गेल्या महिन्यात सीबीआयने सेन्सॉर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेशकुमार यांना छत्तीसगडच्या एका चित्रपट निर्मात्याकडून त्याच्या चित्रपटाला प्रमाणित करण्यासाठी कथित रूपाने ७० हजारांची लाच घेतल्याबद्दल अटक केली होती. याप्रकरणी सीबीआयकडे पुरावे असले तरी ते राकेशकुमारसह या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचू शकलेले नाही व चित्रपटांना प्रमाणित करण्यासाठी निर्मात्यांचे झालेले शोषण उघडकीस आणू शकलेले नाही. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, चित्रपटसृष्टी या लाचखोरांची माहिती देऊ शकते. त्यासाठी अनेक ख्यातनाम अभिनेते, निर्माते, दिग्दर्शकांकडे सीबीआयने चौकशीही केली होती. मात्र त्या सर्वांनी याबाबत मौन स्वीकारले. (लोकमत न्यूज नेटवर्क)