शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

सेन्सॉरने अडविलेल्या माहितीपटाचा ट्रेलर फेसबुकवर

By admin | Updated: July 16, 2017 23:35 IST

नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपट सेंसॉर बोर्डाने अडविला असला तरी दिग्दर्शक सुमन घोष

कोलकता : नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपट सेंसॉर बोर्डाने अडविला असला तरी दिग्दर्शक सुमन घोष यांनी या माहितीपटाचा ट्रेलर फेसबुकवर अपलोड केला आहे. ‘द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ असे माहितीपटाचे नाव आहे. पहलाज निहलानी यांच्या नेतृत्वाखालील सेंसॉर बोर्डाने या माहितीपटातील ‘काऊ’ (गाय), ‘गुजरात’, हिंदुत्व, आणि ‘हिंदू इंडिया’ या चार शब्दांवर आक्षेप घेतला आहे. हे शब्द वगळल्याशिवाय माहितीपटाला परवानगी मिळणार नाही, अशी भूमिका निहलानी यांनी घेतली आहे. माहितीपटाच्या ट्रेलरलाही त्यांनी परवानगी नाकारली आहे. त्याचे कुठल्याही प्रकारचे प्रसारण केले जाऊ शकत नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.तरीही दिग्दर्शक सुमन घोष यांनी निहलानी यांचे आदेश झुगारून चित्रपटाचे ट्रेलर फेसबुकवर अपलोड केला आहे. घोष यांनी आपल्या फेसबुक पेजवर काल टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमचा ‘ द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ हा माहितीपट १४ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. तथापि, आम्हाला त्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्ही ट्रेलरही तयार केला होता. आवडल्यास तो शेअर करा.घोष यांनी आम्हाला संपूर्ण देशातून लोकांचा आणि मीडियाचा पाठिंबा मिळत आहे. त्याबद्दल मी ऋणी आहे, असेही म्हटले आहे.