पनवेलमध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
पनवेल : देशात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येणारी महाशिवरात्र मंगळवारी पनवेल, खारघर, नवीन पनवेल, खांदा कॉलनीमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाविकांनी पहाटेपासून शिव शंभोच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
पनवेलमध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी
पनवेल : देशात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येणारी महाशिवरात्र मंगळवारी पनवेल, खारघर, नवीन पनवेल, खांदा कॉलनीमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाविकांनी पहाटेपासून शिव शंभोच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पनवेलमधील विरुपाक्ष मंदिर, खांदा कॉलनीमधील खांदेश्वर मंदिर, खारघरमधील देवाळेश्वर मंदिरात शिवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. खांदेश्वर मंदिर परिसराला यावेळी यात्रेचे स्वरूप आले होते, तसेच खेळण्यांची दुकाने व विविध दुकानांनी परिसर गच्च भरलेला होता. पंचक्रोशीत गावातील रहिवाशांनी जागृत देवस्थान समजल्या जाणार्या खांदेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी मंदिर परिसराची फुलांच्या सहाय्याने आकर्षक सजावट करण्यात आली होती. खारघरमधील देवाळेश्वर मंदिर व कोपरा गावातील शिव महादेव मंदिरातही दिवसभर भक्तांची रेलचेल सुरू होती. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत संगीत भजनाचे कार्यक्रम सुरू होते. (प्रतिनिधी)फोटो-१७पनवेल महाशिवरात्री