शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उमवि प्रशाळेत मात्रृभाषा दिवस साजरा

By admin | Updated: February 23, 2016 00:03 IST

जळगाव : उमविच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या विद्यार्थ्यांनी २१ रोजी मातृभाषा दिवस साजरा केला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपापल्या मातृभाषेतून कविता,गीत, रीतीरिवाजांची माहिती, विचार अशा विविध कार्यक्रम सादर केले.

जळगाव : उमविच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या विद्यार्थ्यांनी २१ रोजी मातृभाषा दिवस साजरा केला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपापल्या मातृभाषेतून कविता,गीत, रीतीरिवाजांची माहिती, विचार अशा विविध कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ.म.सु.पगार होते.अतिथी औरंगाबाद विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन संचालक प्रा.ए.जी.खान होते.
यावेळी खान यांनी, मूलभूत विचार मातृभाषेतूनच केला जात असतो. त्यामुळे ज्ञाननिर्मिती ही मातृभाषेतूनच व्हायला हवी. इंग्रजी ही जरी ज्ञानभाषा असली तरी तीचे अतिरेकी अनुकरण करु नका. भोवतालाशी जोडलेले राहायचे असले तर मातृभाषा सांभाळायला हव्या याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी डॉ. पगार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ.शोभा शिंदे, डॉ.मुक्ता महाजन, डॉ. सुनील कुलकर्णी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.आशुतोष पाटील यांनी केले. सुत्रसंचालन नरेश पवार या विद्यार्थ्यांने तर आभार कालूसिंग वळवी याने मानले.

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा २७ पासून
जळगाव : उमवि विद्यार्थी कल्याण विभागातर्फे २७ व २८ रोजी आयएमआर महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजत करण्यात आले आहे.
स्पर्धेत महाविद्यालय एक संघ सहभागी घेऊ शकेल. २६ फेब्रुवारीपूर्वी महाविद्यालयांनी प्रवेशीका जमा करावयाच्या आहेत. विजेत्यांसाठी सांघिक प्रथम पारितोषिक ५००१ रुपये चषक,प्रशस्तीपत्र व मानचिन्ह, द्वितीय ३००१ रुपये, तृतीय २००१ रुपये आणि उत्तेजनार्थ १००१ रुपये असे पारितोषिकांचे स्वरुप असेल. यासह दिग्दर्शन, लेखन,अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा अशी वौयक्तिक पारितोषिकेही दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी प्रा.व्ही.व्ही.काटदरे, प्रा.योगेश पाटील यांच्याशी संपर्क करण्यचे आवाहन विद्यार्थी कल्याण विभाग संचालक प्रा.सत्यजित साळवे यांनी केले आहे.