शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

आदित्य हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत

By admin | Updated: May 17, 2016 04:47 IST

आदित्य कुमार सचदेवा हत्याकांड प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी केली.

गया : आदित्य कुमार सचदेवा हत्याकांड प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी केली. आदित्यच्या पालकांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती आणि स्थानिक पोलिसांवर आमचा विश्वास नसल्याचे सांगितले होते. या प्रकरणात जनता दल (यू)च्या निलंबित आमदार मनोरमादेवी यादव यांचा मुलगा मुख्य आरोपी असल्याने चौकशी सीबीआयतर्फे व्हावी, असे पालकांचे म्हणणे होते.ती मागणी मान्य करताना नितीशकुमार यांनी चौकशीचे काम सीबीआयकडे देत असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात मुख्य आरोपी रॉकी यादवचा चुलत भाऊ टेनी यादव याने सोमवारी न्यायालयात शरणागती पत्कारली. रॉकीने आदित्यवर गोळ्या झाडल्या, तेव्हा टेनी यादव त्याच्यासोबत होता. रॉकीचा शोध घेताना पोलिसांना आमदार मनोरमादेवी यांच्या निवासस्थानी दारूच्या बाटल्या आढळल्या होत्या. बिहारमध्ये दारूबंदी असल्याने पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू करताच, त्या गायब झाल्या आहेत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावरील निर्णय १९ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. वाहन ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून गया जिल्ह्यात रामपूर ठाण्यांतर्गत ६ ते ७ मेदरम्यान वाद झाले होते. आदित्य याची गोळी मारून हत्या केल्याचा आरोप आहे. यातील आरोपी टेनी यादवने न्या. ओम सागर यांच्यासमोर शरणागती पत्करली. त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.