शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमधील बनावट चकमकींची सीबीआय चौकशी

By admin | Updated: July 15, 2017 00:27 IST

आसाम रायफल्स आणि पोलिसांकडून झालेल्या कथित बनावट चकमकींची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गुप्तचर खात्याला (सीबीआय) शुक्रवारी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बंडखोरीने त्रस्त असलेल्या मणिपूर राज्यात लष्कर, आसाम रायफल्स आणि पोलिसांकडून झालेल्या कथित बनावट चकमकींची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गुप्तचर खात्याला (सीबीआय) शुक्रवारी दिले. न्यायमुर्ती एम. बी. लोकूर, यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या संचालकांना कथित हत्याकांडाच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांच्या तुकडीची नियुक्ती करण्यास सांगितले आहे. मणिपूरमध्ये वर्ष २००० ते २०१२ दरम्यान सुरक्षा दले आणि पोलिसांकडून झालेल्या बनावट चकमकींत १,५२८ जणांच्या झालेल्या कथित हत्यांची चौकशी करून नुकसान भरपाई मागणाऱ्या सार्वजनिक हिताच्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने हा आदेश दिला. जम्मू-काश्मीर, मणिपूरसारखी जी राज्ये बंडखोरीला तोंड देत आहेत तेथे अतिरेक्यांविरोधात कारवाया करताना आमच्याविरोधात गुन्हे दाखल केले जाऊ शकत नाहीत, असे लष्कराने २० एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.त्या भागांमध्ये आमच्याविरोधात स्थानिक पातळीवर पूर्वग्रहदूषित भूमिकेतून न्यायालयीन चौकशा करण्यात आल्या व त्यामुळे आमची प्रतिमा मलीन झाली असा आरोपही लष्कराने केला होता. प्रत्येक लष्करी कारवाईत लष्करावर अविश्वास दाखवला जाऊ शकत नाही. प्रत्येक न्यायालयीन चौकशी लष्कराविरोधात असू शकत नाही. मणिपूरमधील कथित बनावट चकमकींची प्रकरणे ही हत्याकांडांची नसून काहीशी अतिरेकी कारवायांची आहेत, असे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले होते. >न्यायालयीन चौकशी पूर्वग्रह दूषित?कथित बनावट चकमकींच्या आरोपांची झालेली न्यायालयीन चौकशी पूर्वग्रहदूषित होती व स्थानिक घटक कारण होते, असे लष्कराने न्यायालयाला सांगितले होते. कथित हत्यांची न्यायालयीन चौकशी स्थानिक जिल्हा न्यायाधीशांनी केली व चौकशीत स्थानिक घटक सशस्त्र दलांच्याविरोधात गेले, असाही आरोप लष्कराने केला होता.