शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सीबीआयकडून डॉ.मनमोहन सिंग यांची चौकशी

By admin | Updated: January 21, 2015 02:21 IST

उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला वितरीत करण्यात आलेल्या कोळसा खाणपट्ट्यांबाबत सीबीआयने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची चौकशी केल्याचे वृत्त आहे.

कोळसा खाणपट्टे प्रकरणनवी दिल्ली : उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला वितरीत करण्यात आलेल्या कोळसा खाणपट्ट्यांबाबत सीबीआयने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची चौकशी केल्याचे वृत्त आहे. स्वत: त्यांनी किंवा सीबीआयने याबाबत मौन पाळले आहे.सीबीआय अधिकाऱ्यांचा एक चमू दोन दिवसांपूर्वी डॉ. सिंग यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी गेला होता. या तपास संस्थेला विशेष न्यायालयात २७ जानेवारी रोजी स्थिती अहवाल दाखल करायचा आहे. हिंदाल्को कंपनीला तालाबिरा-२ खाणपट्ट्याचे वाटप करण्यात आल्याबद्दल १६ डिसेंबर रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही चौकशी करण्यात आली. हे वाटप झाले त्या वेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे कोळसा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. दरम्यान, सीबीआयचे प्रवक्ते कंचन प्रसाद यांनी चौकशीबाबत भाष्य टाळले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या एका निकटस्थ सहकाऱ्याला याबाबत विचारण्यात आले असता, त्यांनी चौकशी झाल्याचा इन्कार केला.पत्रांबद्दल विचारपूसकुमारमंगलम बिर्ला यांनी ७ मे २००५ आणि १७ जून २००५ रोजी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पत्र पाठवून तालाबिरा-२ खाणीचे वाटप करण्याची विनंती केली होती. या पत्रांबद्दल यापूर्वी कोळसा मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणा झालेली आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश भरत पराशर यांनी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला नव्हता. त्या काळी कोळसा मंत्रालयाची तात्पुरती जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. सिंग यांची चौकशी करून विविध पैलू विचारात घेण्याचा आदेश न्या. पराशर यांनी दिला होता.