शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आरम नदीवरील केटीवेअर बंधारा निधी अभावी रखडला

By admin | Updated: August 10, 2015 00:28 IST

निकवेल : आरम नदीवर केटीवेअर बंधारा व्हावा म्हणून लोक प्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर केटीवेअर करण्याची मागणी नदीकाठ परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. आरम नदीवर केटीवेअरचे मोजमाप अधिकारी करून घेतात आणि निघून जातात. असे बर्‍याच वर्षापासून सुरू आहे. त्यातच मागच्या आठवड्यात लघुसिंचन जलसंधारण उपविभागीय अभियंता राजेंद्र धूम, शाखा अभियंता पी. डी. जाधव, सचिन गुंजाळ, टेक्निकल अधिकारी ॲस्टिट विकास आहिरे या अधिकार्‍याची टीम ही निकवेल येथे पोहचली. यावेळी उपस्थित ग्रामस्थ शिवाजी सोनवणे, पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव, अभिमन सोनवणे, मन्साराम सोनवणे, मुरलीधर वाघ, कंडू वाघ, चिंतामण वाघ, नानाजी वाघ, उत्तम वाघ, भिका वाघ यांना भेटून केटीवेअरची जागा कुठे आहे. तेथे पोहचताच अधिकार्‍यांनी दहिंदुले गावाशेजारील पुलाच्या खालच्या भ्

निकवेल : आरम नदीवर केटीवेअर बंधारा व्हावा म्हणून लोक प्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर केटीवेअर करण्याची मागणी नदीकाठ परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. आरम नदीवर केटीवेअरचे मोजमाप अधिकारी करून घेतात आणि निघून जातात. असे बर्‍याच वर्षापासून सुरू आहे. त्यातच मागच्या आठवड्यात लघुसिंचन जलसंधारण उपविभागीय अभियंता राजेंद्र धूम, शाखा अभियंता पी. डी. जाधव, सचिन गुंजाळ, टेक्निकल अधिकारी ॲस्टिट विकास आहिरे या अधिकार्‍याची टीम ही निकवेल येथे पोहचली. यावेळी उपस्थित ग्रामस्थ शिवाजी सोनवणे, पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव, अभिमन सोनवणे, मन्साराम सोनवणे, मुरलीधर वाघ, कंडू वाघ, चिंतामण वाघ, नानाजी वाघ, उत्तम वाघ, भिका वाघ यांना भेटून केटीवेअरची जागा कुठे आहे. तेथे पोहचताच अधिकार्‍यांनी दहिंदुले गावाशेजारील पुलाच्या खालच्या भागामध्ये केटीवेअरचे मोजमाप केले, असे बर्‍याच वर्षापासून सुरू आहे. अधिकारी येतात मोजमाप करून निघून जातात; मात्र केटीवेअरचे बांधण्याचे दिवस अजून उजाडत नाही. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी लघु सिंचन जलसंधारण उपविभागीय अभियंता राजेंद्र धूम यांच्यासह सर्वच अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले. त्यावर केटीवेअर बांधण्यासंबंधी निधी उपलब्ध नसल्या कारणाने केटीवेअरचे काम होत नसल्याचे अभियंता राजेंद्र धूम यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी खासदार डॉ. सुभाष भामरे, बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण यांच्याशी संपर्क करून आरम नदीवर केटीवेअर लवकरात व्हावा, अशी मागणी केली आहे; मात्र लोकप्रतिनिधी खासदार, आमदार किती लक्ष घालून काम करतात येणारा काळच ठरवेल. आरम नदीवर केटीवेअर झाल्यास निकवेल, जोरण, उंधणा, विंचुरे, दहिंदुले आदि गावांचा पाणी प्रश्न सुटू शकतो.
कोट
दहिंदुले गावाशेजारी आरम नदीवर केटीवेअर बंधार्‍याचे मोजमाप करून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो शासनापर्यंत पोहोचवण्यात येईल, शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास, तत्काळ केटीवेअरचे काम सुरू करण्यात येईल.
राजेंद्र धूम, उपविभागीय अभियंता, लघुसिंचन जलसंधारण उपविभाग सटाणा
आरम नदीवर केटीवेअर बंधारा व्हावा यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे; मात्र अद्याप शासनाने बंधार्‍यासाठी निधी मंजूर न केल्याने अद्याप बंधार्‍याचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार, दीपिका चव्हाण यांनी लक्ष घालावे.
शेतकरी, अभिमन सोनवणे