शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही स्थितीत जातीनिहाय गणना करणारच, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 07:22 IST

आरक्षण मर्यादा ५०% पेक्षा अधिक होण्याची गरज 

- एस. पी. सिन्हापाटणा : काँग्रेस जातीनिहाय जनगणनेच्या बाजूने असून त्यात कुठलेही दुमत नाही. त्यामुळे कोणत्याही स्थितीत जातीनिहाय जनगणना करणार असल्याचे प्रतिपादन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. याच लोकसभेच्या कार्यकाळात जनगणना पूर्ण झालेली असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

आजच्या आमदार व खासदारांकडे कुठलीही शक्ती नसल्याचा दावा करत गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली. पाटणा येथे शनिवारी आयोजित संविधान सुरक्षा संमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते. 

राहुल गांधी म्हणाले की, देशाची व्यवस्था कोलमडत आहे. ती नीट करण्यासाठी जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता आहे. ज्यांची जेवढी संख्या, तेवढा त्यांना वाटा मिळणे आवश्यक असल्याचे गांधी म्हणाले. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही ५० टक्के आरक्षणाची भिंत पाडून टाकू. प्रत्येक जातीला या देशात वाटा मिळायला हवा.

तेजस्वी यादव यांच्यासोबत राहुल गांधी यांची चर्चालोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पाटणात पोहोचल्याबरोबर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना भेटण्यासाठी येथील हॉटेल मौर्यात दाखल झाले.गांधी येणार असल्याने तेजस्वी अगोदरच हॉटेलमध्ये दाखल झाले होते. गांधी हॉटेलच्या गेटवर पोहोचल्याबरोबर तेजस्वी यादव यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेते तेजस्वींच्या खोलीत दाखल झाले.तिथे राहुल गांधींना भेटण्यासाठी लालू प्रसाद यादवांचे संपूर्ण कुटुंब आले होते. काँग्रेस व राजद यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर राहुल व तेजस्वी भेट दोन्ही पक्षातील तणाव कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी