शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांवर आणणार कॅशलेस उपचार व्यवस्था

By admin | Updated: July 26, 2015 23:49 IST

देशात रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडक शहरे आणि महामार्गांवर रोखरहित

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडक शहरे आणि महामार्गांवर रोखरहित(कॅशलेस)उपचार व्यवस्था लागू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी लवकरच रस्ते वाहतूक-रस्ते सुरक्षा विधेयक आणणार असल्याची ग्वाही दिली. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा धोरण निश्चित करतानाच राष्ट्रीय रस्ते सुरक्षा कृती योजना आणण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखविला. संसदेत सध्या सुरू असलेला गोंधळ आणि राजकारणावर त्यांनी भाष्य टाळले. गुडगाव, जयपूर, बडोदापासून तर मुंबई, रांची, रणगाव, मौंडिया महामार्गावर अपघातातील जखमींसाठी ही रोखरहित उपचार व्यवस्था आणली जात आहे, असे ते म्हणाले.१५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी चांगला पाऊस पाहता चांगले पीक होण्याची शक्यता व्यक्त करीत शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या. कारगिल विजय दिवसानिमित्त शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली. त्यांनी स्वातंत्र्यदिनी काय बोलावे, याबाबत जनतेला सूचना मागितल्या. रक्षाबंधनानिमित्त शौचालयांची भेट देण्याबाबत घेण्यात आलेल्या पुढाकाराचा आणि इस्रोने ब्रिटनच्या पाच उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याचा मुद्दाही उपस्थित केला. ईशान्येकडील राज्यांच्या मुद्यालाही त्यांनी हात घातला. ब्रदर नंबर वन! मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या चमूने ब्रदर नंबर वन (भाई नंबर वन) योजनेसाठी पुढाकार घेतला आहे. बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी शौचालय भेट देणारा भाऊ सर्वोत्तम ठरतो. हे अधिकारी रक्षाबंधनाच्या पर्वावर हे काम करीत असून, त्यामुळे रक्षाबंधनाचा अर्थ कसा बदलला ते बघा. हरदा जिल्ह्याच्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या चमूला मी शुभेच्छा देतो. छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील छोट्याशा केश्ला गावातील एकाही व्यक्तीला खुल्या जागेवर शौचाला जावे लागत नाही, असा उल्लेखही त्यांनी केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)