शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र गायकवाड प्रकरणी संसदेतही राडा, सभागृह तहकूब

By admin | Updated: April 6, 2017 12:37 IST

एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी या वादासंबंधी आज लोकसभेत निवदेन दिले.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 6 - विमानात राडा करणाऱ्या शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांच्या संदर्भात आज संसदेतही गदारोळ झाला आहे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले. एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी या वादासंबंधी आज लोकसभेत निवदेन दिले. रविंद्र गायकवाडांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे. मी एअर इंडियाच्या कर्मचा-यावर पहिला हात उचलला नाही. एअर इंडियाच्या कर्मचा-याने माझी कॉलर पकडून मला ढकलले त्यावेळी मी प्रतिकार केला असा आपला बचाव करताना गायकवाड म्हणाले. 
तू खासदार असशील पण पंतप्रधान नाही असे मला त्या कर्मचा-याने ऐकवले असे गायकवाड म्हणाले. हवाई प्रवास माझा संविधानिक अधिकार आहे. हवाई कंपन्या माझा अधिकार कसा नाकारु शकतात ? असा सवाल गायकवाडांनी विचारला. माझा गुन्हा काय चौकशीशिवाय माझी मीडिया ट्रायल सुरु आहे असे गायकवाड म्हणाले. 
मी वारंवार तिकीटं बुक करुन रद्द केली अशा बातम्या येत आहेत. मी कधी तिकीट बुक करायला गेलो. हवाई प्रवासासाठी आधारकार्ड बंधनकारक केले तर कोण तिकीट बुक करतो ते समजेल असे गायकवाड म्हणाले.
शिवसेनेच्या अन्य खासदारांनीही लोकसभेमध्ये गायकवाड यांची पाठराखण केली आणि त्यांच्यावर अन्याय झाल्याचे अध्यक्षांना सांगितले. एअर इंडिया सुरक्षेला प्राधान्य देत असल्याची बाजू नागरी उड्डाण मंत्री गजापती यांनी मांडली. मात्र यावेळी प्रचंड गदारोळ झाला आणि विमान प्रवास बंदी कुठल्या कायद्यात बसते ते सांगण्याची मागणी खासदारांनी केली. यावेळी प्रचंड गदारोळ झाला आणि कामकाज थांबवण्यात आले.
दरम्यान, पोलीसांनी गायकवाड यांच्यावर खुनाचा प्रयत्न असे गंभीर कलम लावले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. इतके कठोर कलम कसे काय लावले गेले असा सवालही यावेळी सभागृहात उपस्थित करण्यात आला.