आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखलनागपूर : हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रंजना प्रशांत भिसे (२६) रा. डीडीएस चिंचभवन वर्धा रोड या विहिरीतून पाणी काढताना ८ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता विहिरीत पडल्या होत्या. त्यांना उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान तपासाअंती रंजनाचा पती प्रशांत मारोतराव भिसे आणि सासू सुनंदा मारोतराव भिसे यांनी तिला हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी सिंधू शेषराव डवळे रा. बिनाकी ले-आऊट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनेगाव पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.........