घोडीस जखमी केल्याप्रकरणी शेतकर्याविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
आकोट : शेतात चरण्याच्या कारणावरून घोडीस मारहाण करून जखमी केल्याबाबतच्या फिर्यादीवरून आकोट शहर पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी एका शेतकर्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घोडीस जखमी केल्याप्रकरणी शेतकर्याविरुद्ध गुन्हा दाखल
आकोट : शेतात चरण्याच्या कारणावरून घोडीस मारहाण करून जखमी केल्याबाबतच्या फिर्यादीवरून आकोट शहर पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी एका शेतकर्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युनूसखाँ युसूफखाँ याच्या मालकीची घोडी आपल्या शेताजवळ चरण्यास का आली, या कारणावरून शेतकरी अ. गणी अ. रहेमान याने घोडीस मारहाण करून जखमी केले. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली. याबाबत युनूसखाँ युसूफखाँ यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अ. गणी अ. रहेमान याच्याविरुद्ध आकोट शहर पोलिसात भादंवि ४२९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)...................