शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पंपांवरील कार्डबंदी तूर्त मागे

By admin | Updated: January 9, 2017 05:26 IST

बँकांनी कार्डाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर एक टक्का ‘एमडीआर’ शुल्क आकारणे सुरू करण्याचा निर्णय रात्री उशीरा मागे घेतल्याने

नवी दिल्ली : बँकांनी कार्डाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर एक टक्का ‘एमडीआर’ शुल्क आकारणे सुरू करण्याचा निर्णय रात्री उशीरा मागे घेतल्याने देशभरातील पंप चालकांनी सोमवार ९ जानेवारीपासून क्रेडिट अथवा डेबिट कार्डवर इंधन न देण्याचा निर्णयही तूर्त मागे घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत तरी पेट्रोल पंपांवर कार्डद्वारे इंधन खरेदी करता यईल. रोखरहीत व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने डिजिटल पद्धतीने पैसे देणाऱ्यांना इंधनाच्या दरात ०.७५ टक्के सूट देण्याची योजना जाहीर केली होती. त्यानुसार पंपांवर कार्ड वापरल्यास एमडीआर शुल्क लावले जात नव्हते. नोटाबंदीची ५० दिवसांची मुदत संपल्यानंतर बॅँकांनी एमडीआर शुल्क आकारणे सुरू करणार असल्याचे पंपांना कळविले होते. त्यामुळे पंप चालकांनी सोमवारपासून कार्ड न स्वीकारण्याचा पवित्रा घेतला होता. आता बॅँकांनी शुल्क आकारणीचा निर्णय मागे घेतल्याने पंपावरील कार्डबंदी १३ जानेवारीपर्यंत मागे घेण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पंप चालकांना बसणार होता फटका ९ जानेवारीपासून क्रेडिट कार्डाच्या सर्व व्यवहारांवर सरसकट एक  टक्का व डेबिट कार्ड व्यवहारांवर ०.२५ ते एक टक्क्यांपर्यंत ‘एमडीआर’ शुल्क आकारून ते पेट्रोल पंपचालकांच्या खात्यातून  परस्पर वळते करून घेतले जाईल, असे एचडीएफसी व इतर बँकांनी  पंपांना कळविले होते. त्याचा फटका पंप चालकांना बसणार होता.  कार्ड न स्वीकारण्याच्या निर्णयानंतर सरकारने यात हस्तक्षेप केला आणि रविवारी रात्रीच निर्णय मागे घेत असल्याचे पेट्रोल असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले. ९ जानेवारीपासून सर्व पेट्रोल पंपांवर कार्डद्वारे देयक स्वीकारले जाईल. सरकारने यात लक्ष घातल्यानंतर १३ जानेवारीपर्यंत निर्णय मागे घेण्यात आला आहे. तोपर्यंत यावर तोडगा काढला जाईल, अशी अपेक्षा आहे. - रवी शिंदे, अध्यक्ष, पेट्रोल डीलर्स असोसिएशन-मुंबई52000 पंप जे सरकारी कंपन्यांच्या मालकीचे आहेत, त्यावर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकांचे स्वाइप मशीन आहे.