शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना इंप्रेस करण्यासाठी तो चोरायचा कार!

By admin | Updated: April 20, 2017 12:43 IST

एका इसमाने महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हा कारचोरीचा फंडा सुरू केला. मात्र अखेर

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - तरुणी, महिला यांच्यावर छाप पाडण्यासाठी वेगवेगळे फंडे अवलंबणाऱ्यांची या जगात कमतरता नाही. पण 65 वर्षांच्या एका रंगेल इसमाने तर महिलांना इम्प्रेस करण्यासाठी कहरच केलाय. आपली प्रेयसी दुसऱ्या व्यक्तीकडील आलीशान कारमुळे आकर्षित होऊन आपल्याला सोडून गेल्याने त्याने महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हा कारचोरीचा फंडा सुरू केला. मात्र अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 
राज भाटिया असे या कारचोरट्याचे नाव असून, तो गेल्या नऊ वर्षांपासून दिल्लीतील पालम विहार परिसरात राहत होता. राज भाटिया हा अट्टल चोरटा आहे. तसेच त्याच्यावर दिल्ली आणि शेजारील राज्यांमध्ये कार चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच कारचोरीच्या आरोपाखाली त्याला याआधी तुरुंगवासही घडलेला आहे. त्याच्यावर मोकाअंतर्गत गुन्हाही दाखल आहे. 
याबाबत अधिक माहिती देताना डीसीपी विजय कुमार म्हणाले, "पोलिसांनी एक क्रेटा कार चोरीस गेल्यानंतर तपासास सुरुवात केली. त्यानंतर भाटिया आणि त्याच्या सहकाऱ्यांविषयी माहिती आमच्या हाती लागली. हे लोक पालम विहारमधील एका पार्कमध्ये चोरून आणलेल्या गाड्या ठेवत असत. त्यानंतर या पार्कबाहेर अनिल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली चार पोलिसांना पाळत ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले होते."
अखेरीस हा कारचोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आपल्याकडे एक युनिक इलेक्ट्रॉनिक चावी असून, त्याद्वारे कारचे लॉक तोडून आपण कारचोरत असल्याचे  अटक करण्यात आल्यानंतर राज भाटिया आणि त्याच्या सहकारी टोळक्याने सांगितले. चोरी करण्यात आलेल्या कारचा उपयोग आपण महिलांना इम्प्रेस करण्यासाठी करायचो. त्यानंतर या कार पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे एक ते दीड लाख रुपयांना विकायचो, अशी कबुलीही त्याने दिली.