नवी दिल्ली : देशी बाजारात वाहनांच्या मागणीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. जुलैमध्ये सलग तिस:या महिन्यात कार विक्रीमध्ये वाढ नोंदली गेली. या काळात देशी बाजारात कार विक्री 5.क्4 टक्क्यांनी वधारून 1,37,873 एवढी राहिली. जुलै 2क्13 मध्ये 1,31,257 कारची विक्री झाली होती.
वाहन उत्पादक कंपन्यांची संघटना सियामने चालू आर्थिक वर्षामध्ये देशी बाजारातील कारविक्री 5 ते 1क् टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बाजारातील नकारात्मक धारणा दूर झाली असून ग्राहक आता परत शोरूमकडे परतत आहेत. अर्थव्यवस्थेतील सुधारणोसह आगामी महिन्यांतही कारविक्रीत आणखी वाढ होईल, असा विश्वास सियामचे महासंचालक विष्णू माथुर यांनी व्यक्त केला.
वाहन उत्पादक कंपन्या सणासुदीच्या अनुषंगाने कारचे नवनवीन मॉडेल बाजारात उतरवणार आहेत. यामुळे कमीत कमी एक अंकीय वाढ अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कार बाजाराचा वृद्धीदर 2.89 टक्के राहिला. यामध्ये सातत्य राहिल्यास तो यंदा 5 ते 1क् टक्क्यांनी वाढणो अपेक्षित असल्याचे माथुर यांनी सांगितले. जुलैमध्ये देशातील मारुती सुझुकी इंडियाची देशी बाजारातील कार विक्री 15.45 टक्क्यांनी वाढून 72,782 झाली.
च्प्रमुख दुचाकी कंपनी हीरो मोटोकार्पची देशी बाजारातील विक्री 1क्.34 टक्क्यांनी वाढून 4,63,869 आवृत्त्यांवर गेली. दुसरीकडे बजाज ऑटोची विक्री 18.35 टक्क्यांनी घटून 1,25,क्53 वर आली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीच्या 1,53,173 वाहनांची विक्री झाली होती. स्कूटर श्रेणीतील एकूण विक्रीही जुलैमध्ये 37.1 टक्क्यांनी वधारून 3,72,136 आवृत्त्यांवर गेली. गेल्या वर्षी याच महिन्यात 2,71,438 स्कूटरची विक्री झाली होती.