माकडाने उडी मारल्याने गाडी खड्ड्यात
By admin | Updated: June 7, 2014 00:36 IST
अकोला : माकडाने अचानक गाडीवर उडी घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळल्याची घटना बुधवारी रात्रीदरम्यान घडली.
माकडाने उडी मारल्याने गाडी खड्ड्यात
अकोला : माकडाने अचानक गाडीवर उडी घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळल्याची घटना बुधवारी रात्रीदरम्यान घडली. आयटीआय रोडवर राहणारे रामा उंबरकर (३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते स्कॉर्पिओ गाडीने शहराकडे येत असताना, कृषी विद्यापीठासमोरील एटीएमजवळ अचानक त्यांच्या गाडीवर माकडाने उडी घेतली. यात त्यांचे गाडीवर नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन पडली. त्यांनी गाडी जागेवर सोडून दिली आणि ते घरी परतले. गुरुवारी सकाळी ते गाडी घ्यायला परतल्यावर त्यांच्या गाडीतील सोनी कंपनीचा एम्लिफायर व इतर साहित्य असा एकूण २0 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यांच्या तक्रारीनुसार, सिव्हिल लाईन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 000000000000000000