शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाची भीती मनात बसू नये म्हणून मी चौथ्या दिवशी विमान उडवले- कॅप्टन देवी शरण

By मनोज गडनीस | Updated: January 7, 2025 05:57 IST

कंदाहार अपहरणातील आयसी-८१४ चे कॅप्टन देवी शरण निवृत्त

मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कंदाहार अपहरणानंतर वैमानिक म्हणून माझ्या मनात भीती बसू नये म्हणून भीती व तत्सम भावना मनातून झटकून टाकल्या आणि त्या घटनेच्या चौथ्याच दिवशी मी मुंबई ते कोझीकोडे (तत्कालीन कालिकत) आणि कोझीकडे ते शारजा असे विमानाचे उड्डाण केले. आज ४० वर्षे वैमानिक म्हणून काम केल्यावर माझ्या मनात केवळ उत्तम सेवा देऊ शकलो ही कृतज्ञता आहे, अशी भावना आयसी-८१४ विमानाचे उड्डाण केलेल्या कॅप्टन देवी शरण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

भारतीय हवाई उद्योगाच्या इतिहासातील सर्वाधिक भयावह घटना म्हणून नोंद झालेली कंदाहार अपहरणाची घटना २४ डिसेंबर १९९९ या दिवशी घडली होती. एअर इंडियाच्या आयसी-८१४ या विमानाने नेपाळमधील काठमांडू येथून दिल्लीसाठी उड्डाण केले आणि त्यानंतर अवघ्या ४० मिनिटांत विमानात प्रवासी म्हणून बसलेल्या पाच अतिरेक्यांनी शस्त्रे हातात घेत विमानाचे अपहरण केले.

 त्यावेळी विमानामध्ये १७९ प्रवासी आणि ११ केबिन कर्मचारी होते. अपहरण केलेले हे विमान अमृतसर, लाहोर आणि दुबई येथे फिरविण्यात आले. यादरम्यान अतिरेक्यांनी काही प्रवाशांची हत्यादेखील केली. त्यानंतर २५ डिसेंबर रोजी हे विमान अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेण्यात आले. 

अतिरेक्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी या अपहृत प्रवाशांना सोडण्यात आले. अपहरणाच्या या काळात कॅप्टन देवी शरण यांनी अत्यंत संयत भूमिका पाळली आणि अतिरेक्यांशी संवाद साधतानाच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रचंड प्रयत्न केले. वैमानिक म्हणून ४० वर्षे कामगिरी केलेले कॅप्टन देवी प्रसाद शनिवारी निवृत्त झाले. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या शहरातून दिल्लीसाठी त्यांनी अखेरचे विमान उडवले. आपल्या कारकिर्दीमध्ये २५ हजार तास विमान उड्डाण केलेल्या कॅप्टन देवी प्रसाद यांना एअर इंडिया कंपनीने अत्यंत सन्मानाने निरोप दिला.

 

टॅग्स :pilotवैमानिकairplaneविमान