शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘राजधानी’ हुकली? विमानाने जा!

By admin | Updated: May 27, 2016 00:27 IST

रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसचे तिकीट शेवटपर्यंत प्रतिक्षा करूनही कन्फर्म झाले नाही म्हणून प्रवासाची आखलेली योजना पूूर्णपणे मोडित न काढता थोडे अधिक पैसे भरून त्याच ठिकाणी

नवी दिल्ली : रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसचे तिकीट शेवटपर्यंत प्रतिक्षा करूनही कन्फर्म झाले नाही म्हणून प्रवासाची आखलेली योजना पूूर्णपणे मोडित न काढता थोडे अधिक पैसे भरून त्याच ठिकाणी एअर इंडियाच्या विमाने जाण्याचा पर्याय प्रवाशांना लवकरच उपलब्ध होणार आहे.एअर इंडिया आणि आयआरसीटीसी( रेल्वे) यांच्यात यापूर्वीच त्याबाबत करार झाला असून आठवडाभरात तशी व्यवस्था केली जाणार असल्याचे एअर इंडियाचे सीईओ आश्विनी लोहानी यांनी सांगितले. राजधानी एक्स्प्रेसच्या कोणत्याही श्रेणीचे तिकीट कन्फर्म नसेल तर प्रवाशांना एअर इंडियाचे फ्लाईट पकडता येईल. त्यासाठी प्रवाशांना थोडे जास्त पैसे मोजावे लागतील. संबंधित रेल्वेमार्गावरील विमानतळांवर एअर इंडियाची सेवा असावी एवढीच अट राहील. लवकरच या योजनेचा तपशील जाहीर केला जाईल, असे लोहानी यांनी सांगितले.एअर इंडियाच्या विमानाची तिकिटेही या योजनेनुसार आयआरसीटीसीकडूनच उपलब्ध करून दिली जातील. राजधानी एक्स्प्रेसचे एसी फर्स्ट क्लासचे प्रतिक्षा यादीवरील तिकिट असलेल्या प्रवाशांना एअर इंडियाने प्रवास करण्यासाठी कोणतीही जादा रक्कम भरावी लागणार नाही. मात्र सेकंड व थर्ड एसी वर्गाचे प्रतिक्षा यादीवरील तिकिट असणाऱ्यांना प्रति प्रवासी दोन हजार रुपयांपर्यंत जादा रक्कम भरावी लागेल, असे लोहाणी यांनी स्पष्ट केले.एअर इंडियाच्या ‘महाराजा’ने रेल्वे प्रवाशांच्या मदतीला अशा प्रकारे धावून जाण्यात त्याचा स्वार्थही आहे. सततच्या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी एअर इंडियाला प्रवाशांची गरज आहे. या द्विपक्षीय व्यवस्थेमुळे एअर इंडियाला एरवी विमानातील जी आसने रिकामी राहिली असती ती भरण्याची सोय उपलब्ध होईल. (वृत्तसंस्था)