शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनच्या तिकीट सवलती रद्द होणार ठेकेदाराचा इशारा : भाईंदर पालिकेकडून प्रतिपूर्ती नाही

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

राजू काळे

राजू काळे
भाईंदर : पालिकेच्या पीपीपी (पब्लिक ॲण्ड प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावरील परिवहन सेवेकडून तिकीटदरात समाजातील विविध घटकांना देण्यात येणार्‍या सवलती १५ फेब्रुवारीपासून रद्द करण्यात येणार आहेत, असे परिवहन ठेकेदार कंपनीने स्पष्ट केले. या सवलतींची प्रतिपूर्ती (मूळ तिकीटदरातील तफावत) ठरल्याप्रमाणे पालिकेकडून करण्यात येत नसल्याचे कारण यामागे देण्यात येत आहे.
परिवहन सेवेचा ठेका पालिकेने उल्हासनगरच्या मे. केस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला दिला आहे. मात्र, करारानुसार पालिकेने ठेकेदाराला बस आगारासाठी जागा न दिल्याने बस रस्त्यावरच पार्क केल्या जात आहेत. त्यांची दुरुस्तीही एकमेव उड्डाणपुलाखाली केली जात आहे. अत्यावश्यक जागेअभावी बसच्या दुरुस्तीसह पार्किंगही ठेकेदारासाठी डोकेदुखी ठरत आहे. असे असतानाच दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईतही अपेक्षित तिकीट दरवाढ पालिकेकडून करण्यात येत नाही. त्यामुळे कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे. कर्मचार्‍यांना नियमित पगार मिळत नसल्यामुळे आणि बसची वेळीच दुरुस्ती होत नसल्यामुळे ही सेवा औटघटकेची ठरण्याची चिन्हे आहेत. असे असतानाही पालिकेने मुंबईतील बेस्टच्या धर्तीवर व राजकीय मागणीनुसार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात सवलती देण्याचे निर्देश ठेकेदाराला दिल्यानंतर त्या सवलती लागू केल्या. त्या वेळी सवलतींच्या तफावतीची रक्कम पालिकेकडून भरली जाईल, असे ठरविण्यात आल्याचे ठेकेदार कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. परंतु, ही तफावत भरण्यात आलेली नाही. त्यामुळे चार वर्षांत सुमारे ३ कोटींची रक्कम थकीत राहिल्याचा दावा ठेकेदाराने केला आहे. यामुळे या सवलतीच रद्द करण्याचा पवित्रा ठेकेदाराने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या १५ फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या सवलतींच्या मासिक पासातील तफावतीचा दर भरूनच लाभार्थी प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात येणार असल्याचे ठेकेदाराने स्पष्ट केले आहे.
(प्रतिनिधी)
(फोटो - १४भाईंदर बस/नोटीस फलक)